कल्याण पश्चिमेतील भवानी नगरच्या प्रवेश द्वारावर कचऱ्याचे ढिग


कल्याण : अनेक सामाजिक आणि राजकिय चळवळीत अग्रेसर असणार्‍या भवानी नगर येथे नागरिकांचे स्वागत कचऱ्याच्या ढिगाऱ्याने होत आहे.    नुकतीच नालेसफाई झाली. भवानी नगर येथिल मुख्य नाला अर्धवटरित्या साफ करण्यात आला आहे.


पावसाळा सुरू झाला तरी अद्यापपूरग्रस्त भवानी नगर येथिल अंतर्गत गटारी साफ झाल्या नाहीत. असे असतानाच भवानी नगरच्या प्रवेशद्वारावर कचर्याचे ढीग साचले आहेत. हा कचरा पावसाळ्यातील साथीच्या रोगांना आमंत्रण देणारा ठरेल. कचरा गाडी संबंधी रहिवाशांच्या अनेक समस्या आहेत त्यावर तोडगा काढायला हवा अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत.

Post a Comment

0 Comments