सायकलवर इडली विकणाऱ्याच्या लेकीचे सुयश


डोंबिवली ( शंकर जाधव ) परिस्थिती बिकट असली तरी हिम्मत न हरता इडली विकून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत असे.आपल्या मुलीने खूप मोठे व्हावे,आपण जे दिवस पहिले ते आपल्या मुलीने पाहू नये असे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अपार कष्ट करू असा निर्धार केलेल्या पित्याला आपल्या मुलीचे यश पाहून डोळ्यातून आंनदाश्रू आले. सायकलवर इडली विकणाऱ्याच्या लेकीच्या सुयशबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवलीतील हिंदी शाळेतील शालांत परीक्षेत रुची विजयकुमार प्रजापती हिला ८७.४० टक्के गुण मिळाले. मुंब्रा देवी कॉलिनी मध्ये राहणाऱ्या विजयकुमार हे कल्याण स्टेशन बाहेर सायकलीवर इडली विकतात.आपली घरची परिस्थिती हलाखीची असूनही रुचीने या परिस्थितीवर मात करण्याचे ठरविले.


रुचीने दिवसरात्र अभ्यास करून परीक्षेत उत्तम गुण मिळवले पाहिजे असे ठरविले. रुचीचा निकाल पाहून तिच्या वडील्यांच्या डोळ्यातील आंनदाश्रू पाहून रुचीलाही आपले अश्रू आवरता आले नाही.आपल्या मुलीले देशसेवा करावी अशी इच्छा विजयकुमार यांनी व्यक्त केली आहे.  

Post a Comment

0 Comments