केंद्र सरकारच्या योजना वंचितांपर्यंत पोहचवा - माजी आमदार नरेंद्र पवार

 

नागपूरमधील कार्यकर्ता मेळाव्यात नरेंद्र पवार यांचे आवाहन भटके विमुक्त आघाडीच्या संघटनात्मक बांधणीसाठी नरेंद्र पवार विदर्भ दौऱ्यावर


 

कल्याण : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील आठ वर्षात राबविलेल्या सर्व योजना समाजातील वंचित व भटक्या विमुक्तांपर्यंत तसेच  तळागाळापर्यंत पोहचविण्याचे आवाहन माजी आमदार व भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी नागपूरात केले. 

भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या विदर्भ दौऱ्याच्या पहिल्या दिवशी नागपूर मधील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात नागपूर महानगर भटके विमुक्त आघाडीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला यावेळी नरेंद्र पवार बोलत होते.केंद्र शासनाच्या आर टी ई कायद्यानुसार नामांकित शाळांमध्ये आर्थिक दुर्बल पालकांच्या पाल्यांना प्रवेशआत्मनिर्भर भारतअटल पेन्शनआरोग्य विमा योजनागरिबांसाठी घरकुल योजना या व यासह अन्य योजना भटक्या विमुक्त व वंचित समाजातील गरजूंपर्यंत पोचविण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत पोचायला हवे असे आवाहनही पवार यांनी केले. या मेळाव्यात अनेक पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटपही नरेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले. 

Post a Comment

0 Comments