जागतिक योग दिना निमित्त भाजपाच्या वतीने कल्याणमध्ये ५० ठिकाणी कार्यक्रम संपन्न


कल्याण,  : आजच्या धकाधकीच्या जीवनात नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे याकरिता व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, भारतीय जनता पार्टी, कल्याण पश्चिमच्या वतीने विधानसभा मतदारसंघात ५० ठिकाणी जागतिक योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोलीस, शिक्षक, डॉक्टर, वकील, उद्योजक, व्यापारी, शेकडो विद्यार्थी यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते. ‘स्ट्रेस टू स्ट्रेन्थ’ करिता सर्वांनी दररोज योगा व व्यायाम करण्याचे आवाहन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी केले.


‘करो योग, रहो निरोग’ हि उक्ती पाळत नागरिकांमध्ये योग व व्यायाम याबद्दल जनजागृती व्हावी याकरीता २१ जून रोजी संपूर्ण देशभर योग दिन साजरा करण्यात येतो. या वर्षीची थीम ‘मानवता‘ असून कोरोनामध्ये सर्व देशाने एकजुटीने या महामारी विरोधात यशस्वी लढाई केली आहे, त्याचेच द्योतक म्हणून या वर्षी देशातील प्रमुख १०० ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या स्थानांवर हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.


ऐतिहासिक शहर अशी ओळख असलेल्या आपल्या कल्याण शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने ११ ठिकाणी बूथ स्तरावर व ३९ ठिकाणी प्रभाग स्तरावर कार्यक्रम साजरा करण्यात आले. आजच्या स्पर्धेच्या युगात कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रत्येकाने योगाभ्यास करावा असे आवाहन सुद्धा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments