देशातील १४ पर्वतीय स्थळांवर राबविले स्वच्छ्ता व वृक्षारोपण अभियान जागतिक पर्यावरण दिननिमित्त संत निरंकारी मिशनचा पुढाकार


कल्याण : जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात आपले सक्रिय योगदान देत ५ जून रोजी संत निरंकारी मिशनने देशातील ७ राज्यांमधील १४ पर्वतीय स्थळांवर स्वच्छ्ता व वृक्षारोपण अभियान राबविले. ज्यामध्ये १० हजार हून अधिक निरंकारी सेवादल व संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशनच्या स्वयंसेवकांनी भाग घेतला. यामध्ये महाराष्ट्रातील महाबळेश्वर, पांचगणी, लोणावळा, खंडाळा व पन्हाळा या स्थळांचा समावेश होता. देशातील इतर स्थानामध्ये मसुरी, ऋषिकेश, लेन्सटाऊन, नैनीताल, हिमाचल प्रदेश, शिमला, माउंट अबू, सिक्कीम, गंगटोक आदि ठिकाणांचा समावेश होता.


पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संत निरंकारी सत्संग भवन, सेक्टर 19डी, वाशी नवी मुंबई समोरील बागेत मिशनच्या बाल संतांच्या सान्निध्यात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी मिशनच्या स्थानिक प्रबंधकानी मुलांना पर्यावरण संरक्षण विषयक प्रेरणा दिली तसेच या दिशेने मिशन द्वारा देशभर राबविण्यात येत असलेल्या वननेस वन नागरी वृक्ष समूह उपक्रमाची माहिती दिली ज्यायोगे पर्यावरण रक्षणा बरोबरच मानवाच्या शांतिपूर्ण सहअस्तित्वाची शिकवण प्राप्त होते.


    या वर्षी स्वीडन शहराला संयुक्त राष्ट्रांनी 2022 चे जागतिक यजमान म्हणून "Only One Earth" नावाने घोषित केले आहे. पर्यावरणाच्या संकटाच्या काळात, जिथे संपूर्ण जग प्रदूषणाचा सामना करण्यासाठी एकत्र येत आहे, तिथे संत निरंकारी मिशनचे हजारो सेवा दल स्वयंसेवक आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या सेवादारांनी संबंधित शहरातील रहिवाशांसह वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियानाचे आयोजन केले.


         सकाळी ८ वाजता ठिकठिकाणी प्रार्थना करून या सुनियोजित मोहिमेची सुरुवात करण्यात आली तर दुपारी १२.३० वाजता या मोहिमेची सांगता झाली. मिशनच्या तरुण स्वयंसेवकांनी प्लास्टिक प्रदूषण या विषयावर पथनाट्य सादर करून पर्यावरणाच्या संकटाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला.


       प्लॅस्टिकचा वापर करू नका, वायू प्रदूषणावर मात करा, स्वच्छता आणि वृक्षारोपण या संदेशावर जोर देण्यासाठी स्वयंसेवकांनी फलक, बॅनर इत्यादीसह मानवी साखळीही तयार केली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांनी पर्यावरण रक्षणाची शपथही घेतली. संत निरंकारी मिशन संयुक्त राष्ट्रांच्या  कार्यक्रमाच्या थीमवर २०१४ पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा करत आहे.

Post a Comment

0 Comments