शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) उद्या उज्ज्वल भारत शैक्षणिक दृष्ट्या मजबुत आणि युवा पिढी सक्षम होण्यासाठी मुले- मुली शिक्षित होणे आवश्यक असते.राज्याचाच नव्हे तर देशाच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार देण्यासाठी शिवसेनेने नेहमीच पुढाकार घेतला.शैक्षणिक उपराजधानी असलेल्या डोंबिवली शहरात युवा सेना कल्याण जिल्हा युवा अधिकारी दीपेश म्हात्रे आणि माजी नगरसेवक जयेश म्हात्रे यांनी विदर्थ्यांना वह्या वाटप केले.


 युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीतील ठाकूरवाडी कार्यालयात  
प्रभाग क्र. 29 (55 व 53) मधील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा केले.यावेळी  शेकडो विद्यार्थांनी कार्यालयाच्या आवारात गर्दी केली होती. एकीकडे शैक्षणिक साहित्य महागले असताना  दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने राबवण्यात आलेले या उमक्रमामुळे सर्वसामान्य आणि गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यासाठी मोठा आधार ठरत आहे.

Post a Comment

0 Comments