आयुर्विमा महामंडळ भिवंडी शाखेतील कर्तव्यदक्ष विकास अधिकारी सुभाष पाटील साहेब यांचा सेवानिवृत्त सोहळा संपन्न !


भिवंडी दि 14 (प्रतिनिधि) भारतीय आयुर्विमा महामंडळात भिवंडी शाखेत कार्यरत असणारे विकास अधिकारी  सुभाष श्रीरंग पाटील हे आपल्या 37 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत.त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा नुकताच " यशस्वी लाॅन"अंबाडी गाव येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी भालचंद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.


           याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध शिवचरित्रकार तसेच कीर्तनकार सुसेनजी नाईकवाडे ,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ना.पां.पाटील, केशव पाटील,  चंद्रकांत भोईर,साध्वी माता गिरिजानंद,दिनेश पाटील,झिडके ग्रामपंचायत उपसरपंच दिलीप पाटील,सुमती श्रीरंग पाटील आदि मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळेस उपस्थितांपैकी चंद्रकांत भोईर,दिनेश पाटील,सुसेनजी नाईकवाडे  ,साध्वी माता गिरिजानंद,विजय गायकवाड,विलास जाधव,सौ.मथुरा जाधव,नितिन पवार,गुडमॉर्निंग ग्रुप प्रतिनिधि,सौ.सई  भोईर,सुमित भोईर,व सत्कारमूर्ती सुभाष पाटील आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष भालचंद्र ठाकरे आदिंनी आपली मनोगते व्यक्त केली.


या कार्यक्रमाची वैशिष्टे अशी की,सत्कारमूर्ती यांनी पुष्पगुच्छ,शाल तसेच कोणत्याही स्वरूपाची भेट वस्तू न स्विकारता,आपल्या आर्थिक पुंजीमधून सुमारे "एक लाख पंचवीस हजार रुपयांपैकी" एकावन्न हजार रूपये वज्रेशवरी शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेस,अकरा हजार रूपये वाचन मंदिर भिवंडी,यांना धनादेशाने दान स्वरूपात  संबंधित पदाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.व उर्वरित रक्कम अंधःविद्यार्थी शाळा,अनाथ आश्रम,वृद्धाश्रम आदिंना वाटप करण्याचा मनोदय सुभाष पाटील ,यांनी यावेळेस व्यक्त केला आहे.


         .सुभाष पाटील साहेब यांचा  ज्ञानपिपासू सुस्वभाव असल्यामुळे त्यांनी  ज्योतिषशास्त्र,संख्याशास्त्र,वास्तुशास्त्र, योगशास्त्र,लोलक विदयाशास्त्र तसेच व्यक्तिमत्व विकास आदि बाबींवर अभ्यासपूर्ण ज्ञान आत्मसात केले आहे.त्याचबरोबर आपल्या नोकरी मिळविण्याच्या कालावधीत राष्ट्रीयकृत खात्यातील उदा.वायुदल,रेल्वे या स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविलेला आहे.


         याशिवाय आपल्या नोकरी व्यतिरिक्त आपल्या गावी कार्यरत असणारी सुप्रसिद्ध शिक्षण संस्था वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत सचिव,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष हा पदभार जबाबदारीपुर्वक सांभाळलेला आहे.व याच शिक्षण संस्थेत सध्या विश्वस्त म्हणूनही कार्यरत आहेत.तसेच आपल्या आयुष्यात क्रिकेट खेळाबद्दल आकर्षण बाळगून एक उत्कृष्ट खेळाडू आणि समालोचक या भूमिका बजावत असताना,जीवनात भक्तिमार्ग जोपासलेला दिसून येत आहे.


        एकंदरीत एका बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची ओळख या कार्यक्रमातून दिसून आली आहे.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग धनावडे यांनी केले.व सूत्रसंचालन अनिल काकूळते यांनी आपल्या शृंगारिक भाषेने करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.  व कार्यक्रमाचा शेवट म्हणजेच  आभार प्रदर्शन कुमार रोहन पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments