मुलाच्या जयंती निमित्त डंपिंगवरील मुलांना शालेय साहित्य वाटप आणि आर्थिक मदत


कल्याण : स्व.योगेश उल्हास जामदार याची जयंती त्याच्या कुटुंब आणि मित्र परिवाराने अनोख्या पद्धतीने साजरी केलेली पाहायला मिळाली. कल्याणच्या डंपिंग ग्राउंडवर राहणाऱ्या मुलांना शालेय साहित्य वाटप आणि आर्थिक मदत करत सामाजिक भान ठेवून हा उपक्रम घेण्यात आला.


गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात योगेश उल्हास जामदार याचे कोवीडमुळे दुर्दैवी निधन झाले होते. दिव्यांग असूनही मनाने मात्र अत्यंत खंबीर आणि अतिशय मनमिळाऊएक हसतमुख सर्वाँच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असे योगेश जामदार याचे व्यक्तीमत्व होते.


त्याचा आजचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करून त्याला आदरांजली वाहण्याचा मानस त्याचे वडील उल्हास जामदार यांनी व्यक्त केला होता. त्यासाठी पुढाकार घेत डंपिंग ग्राऊंडवरील मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या अनुबंध संस्थेच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबविला.


यावेळी योगेशच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित चिमुकल्यांनीच केक कापला. त्यानंतर उपस्थित कुटुंबिय आणि मान्यवरांच्या हस्ते या मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

Post a Comment

0 Comments