कल्याण : सलग तेराव्या वर्षी सम्राट अशोक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून याही वर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. कोरोना काळात इयत्ता नववीत मुलांनी ऑनलाइन शिक्षण घेतले. दहावीत ऑफलाइन सहा महिने शाळा भरली. आपल्याच शाळेत बोर्ड परीक्षा होणार मंडळाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमधील परीक्षेची भीती दूर झाली. कमी दिवसात विद्यार्थ्यांनी अभ्यास करून यश संपादन केले .कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक शाळेचा सलग तेराव्या वर्षी शंभर टक्के निकाल लागला.
शेतकरी कुटुंबातील गायत्री युवराज चव्हाण या विद्यार्थिनी मावशीकडे शिक्षणाला येऊन 92.40 टक्के गुण मिळवत शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला. वेल्डिंगचे काम करणारे दिगंबर मेश्राम यांचा मुलगा तेजस मेश्राम या विद्यार्थ्याने 90.40 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला. आणि मनस्वी रवींद्र मढवी या विद्यार्थिनीने 89 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.
0 Comments