कुणाल पाटील यांच्या मध्यस्तीमुळे सेंट जॉन शाळेने विद्यार्थ्यांना दिली पाठ्यपुस्तके कोरोना परीस्थित फी सवलत देण्याची केली मागणी


कल्याण : कोरोना कालवधीत दोन वर्षे शाळेची फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना कल्याण ग्रामीण मधील दावडी येथील सेंट जॉन शाळेने पाठ्यपुस्तके दिले नव्हते. याबाबत नगरसेवक कुणाल पाटील यांनी शाळेत जाऊन मध्यस्ती करत या विद्यार्थ्यांना शाळेच्या फी मध्ये सवलत देण्याची मागणी करत पाठ्यपुस्तके देण्यास सांगितले. यावेळी शाळेने देखील या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देऊ केली.


 

गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना मुळे सर्वांचेच आर्थिक नुकसान झाले आहे. तरी अश्या परिस्थिती मध्ये पालकांना शैक्षणिक शुल्क भरणे सुद्धा कठीण जात आहे. त्या अनुषंगाने नगरसेवक कुणाल पाटील यांनी सेंटजॉन शाळेच्या प्राचार्यसमवेत चर्चा केली व सर्व परिस्थिती सांगितली त्यांनी देखील सहकार्य दाखवत येत्या काही दिवसात कॉलेज समिती मध्ये विषय ठेऊन विध्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्याची भूमिका दाखवली.तसेच ज्या विध्यार्थ्यांना पाठयपुस्तके देखील शिक्षण शुल्क न भरल्यामुळे मिळाले नव्हते या विद्यार्थ्याना शाळेने त्वरित पाठय पुस्तके वितरित केले. या बद्दल सर्व पालकांनी पाटील यांचे आभार व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments