माझी वसुंधरा अभियानात कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेची दुसऱ्या क्रमांकाची झेपहाय जंप श्रेणीचे द्वितीय पारितोषिक महापालिकेस प्रदान


कल्याण : माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये  कल्याण-डोंबिवली 
महानगर पालिकेने २२ क्रमांक ओलांडून सोळावा क्रमांक पटकावला असून हाई जंप श्रेणीचे द्वितीय पारितोषिक पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, .
 उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्या हस्ते महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आले.

 
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या कुशल नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली वर्षभराच्या अथक परिश्रमानंतर महापालिकेने  अमृत श्रेणी अंतर्गत ५५०० पैकी एकूण ३३७1 गुणांसह १६ वा क्रमांक पटकावला आहे.


या श्रेणीमध्ये  महानगरपालिकेने  रँकिंगमध्ये गतवर्षीच्या तुलनेत  सर्वोच्च, अतुलनीय कामगिरी करून  थेट १६ व्या स्थानी झेप घेतली असल्यामुळे, महापालिकेस हाय जंप श्रेणीतील दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने टाटा थिएटर ,एनसीपीए मुंबई येथे आज एका दिमाखदार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. 


यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता सपना कोळी- देवन पल्ली, महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, माजी उपायुक्त रामदास कोकरे महापालिका सचिव तथा वृक्ष अधिकारी संजय जाधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments