खूप मोठे व्हा, डोंबिवलीचे नाव देशभरात उंचवा ....आमदारां कडून विद्यार्थ्यांना 'मनसे' शुभेच्छा


डोंबिवली ( शंकर जाधव ) शैक्षणिक , कला, क्रीडा, सांस्कृतिक , साहित्यिक, अध्यामिक क्षेत्रात डोंबिवलीचे नाव देशभरातच नव्हे तर जगात गाजत आहे.पुढील पिढीही डोंबिवलीचे नाव अश्या प्रकारे जगात गाजवतील.विद्यार्थ्यानो खूप मोठे व्हा अश्या 'मनसे' शुभेछा मनसे आमदार प्रमोद
( राजू ) पाटील यांनी दिल्या. डोंबिवलीत एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.


मनसे आमदार राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली पूर्वेकडील  पाथर्ली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षा तथा माजी नगरसेविका मंदा पाटील आणि गावदेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष गंगाराम पाटील यांनी गरजू गोरगरीब विद्यार्थ्यांकरीता मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील यांच्या आमदार निधीतून 50 लाख रुपयांचा मंजूर निधिच्या कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.


यावेळी मनसे शहराध्यक्ष मनोज घरत, शहर संघटक योगेश पाटील, शहराध्यक्ष विद्यार्थी सेना मिलिंद म्हात्रे, उपशहर अध्यक्ष सुहास काळे, गणेश मगरे, प्रेम पाटील, माजी नगरसेविका कोमल पाटील, महिला शहर संघटक स्मिता भणगे, शहर संघटक सुमेधा थत्ते, विभाग अध्यक्षा अंजना होईल, शाखा अध्यक्ष मेघा चोरगे, शर्मिला लोंढे,प्रतिभा पाटील, शलाका कानडे, अंजना भोईर आदी  कार्यकर्ते उपस्थित होते.
  

पाथर्ली येथील मनसेच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या मोफत वह्या वाटप कार्यक्रमात गरजू व गरीब विद्यार्थ्यांना वह्या मिळतात विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. तर रस्ता काँक्रीटीकरण कामात स्थानिक लोकांनी लक्ष ठेवून दर्जेदार काम ठेकेदाराकडून करून घ्या, काम निश्चित चांगले होईल पण आपले लक्ष पाहिजे असेही आमदार राजू पाटील यांनी यावेळी भूमिपूजन कार्यक्रमात सांगितले.

Post a Comment

0 Comments