कल्याण मध्ये शिवसेने तर्फे विद्यार्थी मार्गदर्शन मेळावा


कल्याण : चांगले प्रबोधनात्मक विचार  चांगले आदर्श विद्यार्थी घडवतातआदर्श विद्यार्थी आपले राष्ट्र आदर्श घडवतात. प्रबोधनात्मक विचारांनी विद्यार्थांचे मनोबल व जिद्द वाढावी यासाठी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मार्गदर्शन मेळावा शनिवार दिनांक १८ जुन रोजी सकाळी १० वाजता आचार्य अत्रे रंगमंदिरकल्याण पश्चिम येथे  आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात जेष्ठ साहित्यिक, कवी, प्राध्यापक प्रविण मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शिवसेनेचे कल्याण डोंबिवली महानगर प्रमुख विजय साळवी यांनी दिली.


 

शब्दांमधून प्रकट होणारा संदेश अधिक प्रभावी असतो.  शब्द संकेत करतात. त्या शब्दातून प्रकट झालेल्या विचारांना ते शब्द देणाऱ्याच्या आचरणाचे तारण मिळाले तर  ते विचार केवळ श्रुती पर्यंत पोचत नाहीत तर चित्तावर टंकीत होतात. अशा विचारातून चांगल्या आचाराचे व अनुकरणाचे अंकुर उगवण्याची आशा असते. असे चांगल्या आचरणाचे व अनुकरणाचे अंकुर आपल्या विद्यार्थ्यांवर उगवावेत या प्रामाणिक हेतूने.  महाराष्ट्राचे लाडके  प्रतिभावंत साहित्यिक 

कवी प्राध्यापक प्रविण दवणे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे  यासाठी या प्रबोधनात्मक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. तरी विद्यार्थी वर्गाने या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन विजय साळवी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments