कल्याण पूर्वेत एक दिवसीय शासकीय दाखले वाटप शिबीर

जगन्नाथ शिंदे शिक्षण प्रसारक मंडळ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे आयोजन

कल्याण दहावी बारावीचे निकाल नुकतेच लागले असून पुढील शैक्षणिक प्रवेशाची लगबग विद्यार्थ्यांची सुरु आहे. या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांची हि गरज लक्षात घेऊन कल्याण पूर्वेत जगन्नाथ शिंदे शिक्षण प्रसारक मंडळ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने एकदिवसीय शासकीय दाखले वाटप शिबीराचे आयोजन शनिवारी करण्यात आले आहे.


कल्याण पूर्व मॉडेल कॉलेज चिंचपाडा रोड येथे शनिवारी २५ जूनरोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डोमिसाइल सर्टिफिकेटउत्पन्नाचा दाखलास्थानिक रहिवासी दाखलाज्येष्ठ नागरिक ओळखपत्र असे शासकीय दाखले काढून देण्यात येणार आहेत. यासाठी लागणारी कागदपत्र सोबत घेऊन येण्याचे आवाहन आयोजक प्रशांत काळेमा. नगरसेविका माधुरी प्रशांत काळेमा.नगरसेवक निलेश शिंदे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments