अनुराग नाट्य संस्थेचा ४८ वा वर्धापनदिन साजरा


कल्याण : अनुराग, कल्याण या संगीत विभाग, बाल विभाग व नाटय विभाग असलेल्या व जिल्ह्यात प्रथम बाल नाट्य चळवळ सुरु करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील ३-४ जुन्या नाट्यसंस्था पैकी एक जुनी व कल्याणतील सर्वात जुन्या नाट्य संस्थेचा ४८ वा वर्धापन दिन अत्यंत थाटात नुकताच आचार्य अत्रे रंगमन्दिर कल्याण प. येथे माजी आमदार व  संयोजक भाजपा भटके विमुक्त अघाड़ी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या प्रयोजकत्वाने संपन्न झाला.

या प्रसंगी विविध स्पर्धांमध्ये गाजलेल्या ३ एकांकिका व एक धम्माल बालनाट्य अत्यंत सुंदर पणे संस्थेतर्फे सादर करण्यात आले. या शिवाय अंतरराष्ट्रीय फादर्स डे निमित्त संस्थेचा कलाकार रोशन राठोड याने लिहिलेली "बाप" ही अत्यंत हॄदस्यस्पर्शी कविता त्याने स्वतःच सादर केली. या सर्वच कार्यक्रमात सादर झालेल्या सर्वच कलाकृतिंचे रसिक प्रेक्षकांनी, उदंड प्रतिसाद देवून भरभरून कौतुक केले.


स्वेच्छा शुल्क असलेल्या एकूण चार एकांकिकेच्या या कार्यक्रमात, संस्थापक व अध्यक्ष मेघन गुप्ते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, पुढील-महाकवि कालिदास १० जुलै "आषाढ़ी एकादशी निमित्त संस्थेच्या संगीत विभागा तर्फे संपन्न होणाऱ्या, "भक्ति रस संध्या" या अत्यंत लोकप्रिय भक्ति गीतांच्या कार्यक्रमाचीतसेच दिवाळी च्या सुट्टीत आयोजित करण्यात येणार असलेल्या, "५ दिवसीय निवासी नाट्य प्रशिक्षण शिबिराची घोषणा केली.


 तर दूसरे संस्थापक अरविन्द सरफरे यांनी संस्थेच्या आता पर्यन्त च्या वाटचालीचा आढावा घेतला. नरेंद्र पवार हे त्यांच्या पूर्व नियोजित अनेक कार्यक्रमा मुळे जरी उपस्थित राहु शकले नसले तरी कार्यक्रमाची सूत्र संचालिका प्रियंका ढोमसे हिने त्यांचा, त्यांच्या बालपणा पासून संस्थेशी असलेला ऋणानुबंध रसिक प्रेक्षकाना रंजक पणे कथन केला. 

Post a Comment

0 Comments