भारतीय जनता पार्टीच्या वतीने बी आर नगर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन


दिवा, प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीच्या वतीने व बिंदू फाउंडेशन च्या सहकार्याने दिव्यातील तरुण तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने रोजगार मेळावा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. बिंदुरा फाऊंडेशन च्या अध्यक्षा ऍड. बिंदू दुबे दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे, महिला मंडळ अध्यक्षा ज्योती पाटील अंकुश मढवी यांनी हे शिबिर दिवा मंडळ पदाधिकारी यांच्या सहकार्याने आयोजित केले होते.


यावेळी ठाणे शहर कार्यकारणी सदस्य विजय भोईर समीर चव्हाण युवराज यादव राजकांत पाटील अमरनाथ गुप्ता समशेर यादव अशोक सोळंकी राहुल साहू डॉक्टर आघाडी अध्यक्ष विद्यासागर दुबे उत्तर भारतीय अध्यक्ष अजय सिंग गुजराती सेल अध्यक्ष रमेश मोरा अवधराज राजभर आदी कार्येकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments