महानगरपालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम, पर्यावरणातील सर्वच घटकांची काळजी घ्या...आयुक्त विजय कुमार म्हसाळ


भिवंडी, प्रतिनिधी : महानगरपालिकेच्या वतीने आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पोगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ  आणि स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे यांच्या हस्ते भारतीय प्रजातीची वृक्ष लावून वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.


यावेळी शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड पर्यावरण विभाग प्रमुख नितेश चौधरी, उद्यान विभाग प्रमुख निलेश संखे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले व अन्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ  यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व विशद करून, लावण्यात आलेल्या प्रत्येक झाडाची काळजी घेणे, रक्षण व संवर्धन करणे आवश्यक आहे.पर्यावरण दिन आहे पर्यावरणाला हानिकारक ठरणारे सिंगल प्लास्टिकवर बंदी आहे .


सिंगल युज प्लास्टिक विरोधात मोहीम सुरू करण्यात येणार आहे, त्यामुळे सिंगल युज प्लास्टिक वापरू नये असे आवाहन देखील याप्रसंगी आयुक्त यांनी  केले. पर्यावरणाचे रक्षण म्हणजे पर्यावरणाचा सर्वच घटकावरील रक्षण व संवर्धन करणे होय. पालिकेच्या वतीने प्रत्येक झाडाची तपासणी करण्यात येणार आहे. झाडाला मारलेले खिळे,  त्यावर लावण्यात आलेले बॅनर्स, पोस्टर्स, नामफलक इत्यादी काढून घेण्यात येणार आहेत.


यापुढे झाडाला खिळे मारणे, पोस्टर्स,  बॅनर्स बोर्ड लावणे,  अन्य मार्गाने झाडाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील पालिका आयुक्त यांनी दिला.प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ मियावकी यांच्या संकल्पनेप्रमाणे वृक्ष लागवड ,वृक्ष संवर्धन करणे आवश्यक असल्याचे  आयुक्त यांनी नमूद केले. याप्रसंगी  स्थायी समिती समिती सभापती संजय म्हात्रे यांनी पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.


आजच झाडे लावा, वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे जर आज पर्यावरणाचे रक्षण केले तरच आपले आपोआप रक्षण होणार ही बाब सभापती संजय म्हात्रे यांनी नमूद केले. आज पोगावं येथील रस्त्याच्या दुतर्फा एकूण 100  भारतीय प्रजाती वृक्ष यांची लागवड करण्यात आली.

Post a Comment

0 Comments