राज ठाकरेंचे पत्रक महाराष्ट्र सैनिकांच्या मार्फत डोंबिवलीत घरोघरी पोच

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) मजिदिंवरील भोंग्यावरून संघर्ष शिगेला पोहचला असताना "सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन हे झालेच पाहिजे' अन्यथा आम्हीही लाऊडस्पीकरवर डबल आवाजात हनुमान चालीसा लावू" असे जाहीर वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाहीर सभेत केले होते.यांनी करताच सरकारला कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागली आणि बऱ्याच मजिदिंवरील सकाळची अजान भोंग्यावर देणे बंद झाले व इतर वेळीही आवाजाची मर्यादा पाळण्यात आली.


परंतु हे तात्पुरते न होता कायम स्वरूपी कायदा पाळण्यात यावा यासाठी राज ठाकरे यांनी एक पत्रकच महाराष्ट्रातील जनतेला लिहिले आणि सर्व कार्यकर्त्यांना नागरिकांच्या घरोघरी जाऊन देण्यास सांगितले.मनसैनिक हे  पत्रक डोंबिवलीत मनसे नेते तथा आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवलीत घरोघरी देण्यास सुरुवात केली आहे.प्रथम एक पत्रक हनुमान मंदिर येथे मारुतीराया चरणी अर्पण करून विभागातील नागरिकांच्या घरोघरी, दुकानात, कार्यालयात देण्यात आले, विभागातील नागरिकांनी या भूमिकेचे स्वागत करून स्तुती केली.


त्यावेळी उपशहर अध्यक्ष  राजू सदू पाटील, माजी नगरसेवक अमित सुलाखे,  यतीन पाडगावकर, शाखाध्यक्ष  महेश पांचाळ, शाखाध्यक्ष अश्विन पाटील, शाखाध्यक्ष नंदकिशोर भोसले कचले , संजय बाविस्कर, गणेश कदम आदी पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.तसेच आम आदमी पार्टी या पक्षाचे नूतन कार्यालय सुरु झाले त्यांना शुभेच्छा देऊन राज ठाकरेंच्या विचाराचे पत्रक देखील सुपूर्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments