कोरडेपाडा गावात वृक्षारोपण करत वन विभागाची जनजागृती


कल्याण : नुकताच जागतिक पर्यावरण दिन संपूर्ण जगात साजरा झाला. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने बुधवारी  पडघा रेंज मधील किरवली परिमंडळ मधील कोरडे पाडा  या गावात वन परिक्षेत्र कार्यालय पडघा व संयुक्त वन व्यवस्थापन समिती आवळे विश्वगड यांचे संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व जनजागृती सभा घेण्यात आली. हा कार्यक्रम वनक्षेत्रपाल पडघा शैलेश देवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.


कार्यक्रमाची सुरुवात कोरडेपाडा गावालगत जंगलात वृक्षारोपण करून करण्यात आली. या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते, जांभूळ, रिठा, आवळे, ही रोपे लागवड करण्यात आली. त्यानंतर गावात येऊन सभेला सुरुवात झाली. सदर कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपले पर्यावरण विषयी मते प्रकट केली.


यावेळी किरवली परिमंडळ मधील कोरडे पाडा, विश्वगड, कोशिंबे, खबाळे, दाभाड, आवळे परिसरातील नागरिकांचा वन विभागाला सदैव सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सूत्र संचालन सरपंच ग्रुप ग्रामपंचायत आवळे विश्वगड तथा जेएफएम समिती अध्यक्ष अनंता जाधव यांनी केले.


या कार्यक्रमात उपसरपंच आवळे विश्वगडचे निखिल जाधव, देविदास पाटील,  ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आनगाव शाखेचे सेवानिवृत्त मॅनेजर साईनाथ पवार, केतन जाधव पोलीस पाटील, सचिन पवार, तसेच सर्व सदस्य ग्रुप ग्रामपंचायत आवळे विश्वगड तसेच जेएफएम सदस्य गणेश जाधव, साईनाथ जाधव, गणेश जाधव, नंदा जाधव, भावना कोरडे, बाळाराम कोरडे, तसेच प्रमुख पाहुणे सदू पाटील , किशोर बजागे, जयदास जाधव,  दिनेश मेघे अध्यक्ष संयुक्त वन समिती हे उपस्थित होते.


दिनेश मेघे यांनी देवचोडे गावात ग्रामस्थांच्या सहकार्याने जंगल संरक्षण व संवर्धन करून कशा प्रकारे जंगल वाढविले या बाबत ग्रामस्थांनाअनमोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी वनपरिक्षेत्र कार्यालय पडघा चे कर्मचारी दिनेश माळी, श्याम चतुरे, विलास सकपाळ, अमित कुलकर्णी, सचिन मोरे, पावरा, विकास उमतोल, हे उपस्थित होते.


तसेच भगवान सवर, शांताराम भोईर,  लहू जाधव, शांताराम जाधव, यांनी विशेष सहकार्य केले.
 आभार प्रदर्शन करताना वनपाल किरवली साहेबराव खरे यांनी सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जेएफएम सदस्य व इतर सहभागी ग्रामस्थ यांचे आभार मानले. या उपक्रमात ग्रामस्थ कोरडे पाडा, विश्वगड यांनी मोठ्या आनंदात व मोठया संख्येने सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments