केडीएमसी निवडणुकीत राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारारा राष्ट्रवादीच्या वर्धापन दिना निमित्त कल्याण डोंबिवली जिल्हयाच्या वतीने विविध उपक्रम


कल्याण : आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिले आहेत.  


कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त  कार्यक्रमा ची माहिती देताना आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड, जिल्हा सचिव प्रशांत माळी, कल्याण विधानसभा अध्यक्ष संदीप देसाई, कार्यध्यक्ष उदय जाधव  आदी पदाधिकारी उपस्थित होते.


राज्यातील सत्तेमध्ये आम्ही सर्व एकत्र असून केडीएमसी निवडणुकीतही आघाडी होण्याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र आघाडी न झाल्यास केडीएमसी निवडणूक स्वबळावर लढवण्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केला. 


ओबीसी आरक्षणबाबत न्यायालय जो काही निर्णय देईल तो देईल. परंतु न्यायालयाने हे आरक्षण नामंजूर केले तरी आगामी केडीएमसी निवडणुकीत २७ टक्के ओबीसी उमेदवारांना संधी देण्याची पक्षाची भूमिका असल्याचेही जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. 


तर आगामी केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या दारी हा हा उपक्रम राबवणार आहे. याच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सुविधांबाबत जागृत जागृत केले जाणार आहे.


त्यासोबतच त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून १६ जुन पर्यंत वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, जेष्ठ नागरिकांचा सन्मान, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, पर्यावरण जनजागृती आदी  विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.


दरम्यान राष्ट्रवादी पार्टीच्या कल्याण डोंबिवली जिल्हयात सुरू असलेल्या गटबाजीबाबत जिल्हाध्यक्ष शिंदे यांना विचारले असता, आमच्यात कोणतेही गटतट नसून सर्वजण एकत्रपणे काम करून राष्ट्रवादीला जास्तीत जास्त यश मिळवून देऊ असे सांगितले.

Post a Comment

0 Comments