कल्याणात झाड अंगावर पडून आई आणि मुलगा जखमी

 


कल्याण :- कल्याण पश्चिमेत   रस्त्यावरुन जात असताना अचानक झाड कोसळून त्यामध्ये आई आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. कल्याण पश्चिमेच्या ठाणगेवाडी परिसरात ही घटना घडली असून जखमी आई आणि मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


कल्याण पश्चिमेच्या बिर्ला कॉलेज परिसरात राहणाऱ्या सुनिता भांगरे या त्यांच्या मुलाला भाविकला शाळेतून आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी शाळेतून मुलाला घेऊन येत असताना ठाणगेवाडी परिसरात असणारे भलेमोठे झाड अचानक अंगावर कोसळले.


ज्यामधे सुनिता आणि भाविक हे दोघेही जखमी झाले. स्थानिक नागरीकांनी झाड बाजूला करुन दोघांना बाहेर काढत आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. या घटनेत भाविकच्या पायाला दुखापत झाली असून सुनिता यांनाही मार लागला असल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments