शिवराज्य ब्रिगेडच्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन

 


कल्याण : महिलांवर होणारे अत्याचारबेरोजगारांना रोजगार कसा मिळावा समाज न्याय हक्क अश्याच समस्यांना घेत गेल्यावर्षी शिवराज्य ब्रिगेड संघटनेची स्थापना करण्यात आली होती. गेल्या वर्षापासूनच आत्तापर्यंत या संघटने मध्ये जास्तीत जास्त युवकांनी आपला सहभाग दर्शविला आहे. येत्या ७ जून रोजी शिवराज्य ब्रिगेडचा पहिला वर्धापन दिन असून दादर पश्चिम येथील शिवाजी नाट्य मंदिरात भव्य दिव्य अशा वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री आमदार जयवंत पाटील,  नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालक मंत्री एकनाथ शिंदेमाजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत,  आमदार नाना पटोले,  डॉ. राजू वाघमारे,  परिमंडळ ५ मुंबई पोलीस उपायुक्त प्रणय अशोक आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून शिवराज्य ब्रिगेडचे अध्यक्ष अमोल  जाधवराव यांच्या अध्यक्षतेखाली भव्य दिव्य १ला वर्धापन दीन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 


या कार्यक्रमात समाजसेवेचा ध्यास घेतलेल्या सत्कार मूर्तींना स्वराज्य भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष अमोल जाधवराव यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments