अनाथ आश्रमात कांताराम जाधव यांच्या चारोळी संग्रहाचे प्रकाशन टिटवाळा येथील पारस बाल भवनात पार पडला सोहळा अनाथ मुलांसोबत साजरा केला ६० वा वाढदिवस


कल्याण : कल्याण पूर्वेतील रहिवासी असलेल्या कांताराम जाधव यांच्या चारोळी संग्रहाचे प्रकाशन टिटवाळा जवळील म्हसकळ येथील पारस बाल भवन वृद्धाश्रम येथे अनाथ आश्रमाच्या संस्थापिका संगिता गुंजाळ आणि अनाथ मुलांच्याहस्ते अनोख्या पद्धतीने करण्यात आले.


यावेळी कांताराम जाधव यांची मुलं अॅड. केतन जाधव, डॉ. ज्ञानेश्वर जाधव, आदिनाथ जाधव, सुना अस्मिता जाधव, डॉ. कविता जाधव, नातू मेघराज जाधव, अंश जाधव, पारस बाल भवनचे संजय गुंजाळ आणि जाधव कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी कांताराम जाधव यांचा ६० वा वाढदिवस देखील याठिकाणी साजरा करण्यात आला.


कांताराम जाधव यांचे मुळगाव मु.पो. अवसरी (बु) पुणे असून त्यांचे शिक्षण, शिवाजी विद्यालय,धामणी, पुणे येथे १९८० साली झाले. त्यांनी टिळक नगर विद्या मंदिर, डोंबिवली येथे ३७ वर्ष कनिष्ठ लिपिक म्हणून काम केले असून सध्या ते सेवानिवृत्त आहेत.


 गेल्या ३७ वर्षात त्यांनी शासकीय जि.प, पंचायत समिती, बोर्ड, समाज कत्याण, जिल्हा समाज कार्यलय, पे यूनिट, उफकोषागार, कोषागार, शिक्षण उपसंचालक कामात नेहमी मदत केली आहे व सेवानिवृत्ती नंतरही काम करत आहेत. यात प्रामुख्याने प्रतवारी, शिष्यवृत्ती, सवलत, ईबीसी, जी.आर तपासणी, बोर्ड निकाल वाटप व इतर साहित्य वाटप व सभेला नेहमी मदत केली आहे.


कांताराम जाथव यांचा अत्य परीचय म्हणजे लहानपणापासून ते एक स्वछंदी व्यक्ती आहे. त्यांना वडिलांपासूनच गाण्याचा छंद होता. कवी कांचन या नावाने त्यांनी कविता लिहिल्या आहेत. त्यांचे १९९५ ते आजपर्यत सतत लिखाण चालू आहे. त्यांनी दोन महीन्यापुर्वी यूट्यूबवर तीन गाणी गायली आहेत.


त्यांच्या लिखाणात प्रेम, आई, वडील, भाऊ, बहीण, नातलग,राग, वाद, बंधनं, क्रोध, रंग या विविध छटा असतात. त्यांच्या 'चारोळी (प्रथम भाग) हे पूस्तक आज पारस बाल भवन या अनाथ आश्रमात प्रकाशित करण्यात आले. यावेळी जाधव यांनी आपला ६० वा वाढदिवस देखील या चिमुकल्यांसोबत साजरा करून आनंद द्विगुणीत केला


दरम्यान कांताराम जाधव यांनी अनाथ आश्रमात आपल्या पुस्तकाचे प्रकाशन आणि वाढदिवस साजरा केल्या बद्दल अनाथ आश्रमाच्या संस्थापिका संगीता गुंजाळ यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments