मॉडेल इंग्लिश स्कूलचा निकाल 99.28 टक्के


डोंबिवली ( शंकर जाधव )  माध्यमिक शाळांत परीक्षेसाठी बसलेल्या डोंबिवलीतील मॉडेल इंग्लिश स्कूल शाळेचा निकाल 99.28 टक्के लागला आहे. निवासी विभाग, खंबाळपाडा आणि सोनारपाडा या मॉडेल शाळेच्या तिन्ही शाखांमध्ये शालांत परीक्षेला एकूण 420 विद्यार्थी बसले होते. त्या विद्यार्थ्यांमधून 417 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कु. रोशनी साथियाबलन नायर ही सर्व तिन्ही शाळांतून पहिली आली असून तिला 96.80 टक्के मार्क मिळाले. शाळा संस्थेच्या संचालक कमिटीने तसेच शिक्षकवृंदानी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


    मॉडेल इंग्लिश स्कूल संस्थेतर्फे उच्चश्रेणी, विशेष उल्लेखनीय आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी अध्यक्ष वर्गीस डॅनियल, बाबू बालकृष्णन, पी. व्ही. सदाशिवन नायर, सी. अरविंदन, व्ही. नारायणन, एन. बी. शेखर, उन्नी अथीलत, सी. के. मोहनचंद्रन नायर, मुख्याध्यापिका ललिता मोहनदास यांच्यासह शिक्षकवृंद आणि पालक उपस्थित होते.


     यावेळी संस्थाध्यक्ष वर्गीस डॅनियल म्हणाले, पूर्वीपासून विद्यार्थ्यांनी उच्चश्रेणी आणि उत्तीर्ण होण्याची प्रथा कायम ठेवली आहे. नेहमी शाळेचा निकाल शंभर टक्के ठेवण्यात विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यावर्षी कदाचित कोरोनामुळे शंभर टक्के निकालाला ब्रेक लागला असेल. परंतु विद्यार्थ्यांनी हे यश मिळविल्याचा संस्थेला आनंद आहे.


     शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेली साथ यामुळे हे यश मिळाले आहे. रोशनी साथियाबलन नायर  96.80, अभिराम मुरलीधरन नायर 94.20,  श्रीया श्रीजेश कुरूप 93.40, शताक्षी किशोर मराठे 93.40 मार्क मिळवून या विद्यार्थ्यांनी मॉडेल इंग्लिश स्कूल शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

Post a Comment

0 Comments