निळजे गावातील सुमनताई वसंत पाटील कनिष्ट महाविद्यालयाचा सलग 5 वर्ष १०० टक्के निकालडोंबिवली  ( शंकर जाधव ) कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी झटणाऱ्या निळजे महाविद्यालयाचा जयजयकार होत आहे. लागोपाठ सतत गेली पाच वर्षे सुमनताई वसंत पाटील कनिष्ट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी इयत्ता 12 वी च्या निकालात शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.


या ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, संस्थाचालकांच्या परिश्रमाला विद्यार्थ्यांच्या मेहनतीने चार चाँद लागले असल्याची जॉर्डसार चर्चा ग्रामीण विभागात रंगली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंत पाटील यांनी या यशाचे श्रेय विद्यार्थी व शिक्षक यांना दिले आहे.

    
कल्याण-शिळ मार्गावरील निळजे गावात संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सुमनताई वसंत पाटील कनिष्ट महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागात विद्यार्थी शिक्षण घेत असले तरी त्यांना परिपुर्ण 
विद्यार्थी घडविण्यावर भर दिला जातो. पुर्वीपासूनच शिस्त आणि चांगले संस्कार विद्यार्थीना दिले जातात. शिक्षणाबरोबर विद्यार्थीचा व्यक्तीगत विकास करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे शिक्षण दिले जाते.


आमचं महाविद्यालय म्हणजे आमचे कुटुंब असा संदेश विद्यार्थ्यांना दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची वेगळी ओढ निर्माण होते. कोरोना काळातही प्रत्येक विद्यार्थ्याकडे जातीने लक्ष दिल्यामुळे आणि त्याला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने आमच्या नेहमीच्या शंभर टक्के निकालाला ब्रेक लागला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे असे मुख्याध्यापिका जयंती अय्यर म्हणाल्या.
    

तर संस्था संचालक महेंद्र पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी संस्था अहोरात्र परिश्रम घेत आहे. शिक्षणाबरोबर धार्मिक, अध्यात्मिक, पर्यावरणीय उपक्रम आमच्या येथे मुलांच्या माध्यमातून राबविले जातात. यामुळेच विद्यार्थी कृतिशील व प्रगतिशील बनण्यासाठी चालना मिळते.


यश हे बौद्धिक व शाररिक मेहनतीने मिळते. नियमित परीक्षा, सराव परीक्षा, पालकसभा, व्यावसायिक प्रशिक्षण, सर्वेक्षण आदी गोष्टींमुळे विद्यार्थ्यांची प्रगती होते, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना संदेश देताना सांगितले.

Post a Comment

0 Comments