जिद्दी धरली आणि त्या समाजसेविका वयाच्या 47 वर्षी 10 वि उत्तीर्ण

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील समजसेविका  सुहासिनी राणे यांनी वयाच्या 47 वर्षी 10 वीत 56 टक्के मिळवून उत्तीर्ण झाल्या.आधी परिस्थितीमुळे राणे यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही.पण जिद्दीच्या जोरावर त्यांनी १० वि च्या परीक्षेत बसण्याचा निर्णय घेतला.राणे यांच्या निर्णयाचे त्यांची मुलगी विशाखा हिने स्वागत करत अभ्यासात मदत केली.


आपल्यावर उभे राहून राणे यांनी १० वीच्या परीक्षेत 56 टक्के गुण मिळविल्याने डोंबिवलीतूनच नव्हे तर त्यांच्या गावातूनही कौतुक होत आहे. वकील होऊन समाजातील गोर गरिबांना न्याय मिळवून देण्यातही राणे यांनी एल एल बी करण्याचा निर्णय घेतला.

Post a Comment

0 Comments