मृत्युंजय आन ठाकूर आणि मान ठाकूर स्मृतींंना उजाळा


डोंबिवली ( शंकर जाधव )  ३ मे १७३९ रोजी वसईच्या रणसंग्रामातील हुतात्मे , डोंबिवलीतील आगरी समाजाचे दोन तरुण सख्खे भाऊ मृत्युंजय आन ठाकूर आणि मान ठाकूर यांनी किल्ल्याला सुरुंग लावताना वीरगती प्राप्त झाले.स्वराज्याचा भगवा झेंडा वसईच्या किल्ल्यावर फडकला.


        भारतीय इतिहास समिती डोंबिवली शहर आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून डोंबिवली पश्चिमेकडील राजू नगर येथील मृत्युंजय आन ठाकूर आणि मान ठाकूर स्मृतीस्थळ उभारले आहे. या दोन्ही वीर बंधूंच्या बलिदानाचे स्मरण म्हणून ३ मे शौर्यदिन साजरा करण्यात आला.


    यावेळी कान्होजी आंग्रे यांचे वशंज रघुजीराजे आंग्रे ( शिवाजी रायगड स्मारक मंडळ अध्यक्ष ), आमदार रविंद्र चव्हाण, इतिहास संकलन समिती (कल्याण जिल्हा ) चंद्रकांत जोशी,इतिहास  संकलन समिती ( कोकण प्रांत ) सुरेश खेडकर,भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे,दीपक ठाकूर, भाजपा माजी नगरसेवक विकास म्हात्रे, शिवसेनेचे माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार चव्हाण म्हणाले, काही वर्षापूर्वी ठरवल होत कि या उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर स्मृती स्थळ उभारावे.


        प्रयत्न केल्यानंतर या जागेवर मृत्युंजय आन ठाकूर आणि मान ठाकूर स्मृती स्थळ उभे राहिले.वीरगती प्राप्त झालेल्या दोन बंधूचा इतिहास तरुण पिढीला माहित असणे आवश्यक आहे. या वस्तुत सर्वांनी नतमस्तक झाले पाहिजे.या वस्तुत शाळेच्या विद्यार्थ्यांना आणणे पाहिजे, त्यांना हा इतिहास सांगितला पाहिजे.


    कान्होजी आंग्रे यांचे वशंज रघुजीराजे आंग्रे म्हणाले,गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय पटलावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरून अनेक चर्चा सुरु आहे.ज्यांचे राजकीय भविष्य नाही अश्यांनी लोकमान्य टिळकांवर न बोलले बरे.हे लोकशाहीने दिलेल्या हक्काचा दुरुपयोग आहे असच म्हणाव लागेल.वीर गतीला प्राप्त झालेले मृत्युंजय आन ठाकूर आणि मान ठाकूर हे पुढील पिढीला प्रेरणा देणारे आहेत.

Post a Comment

0 Comments