डोंबिवली ( शंकर जाधव ) स्मार्ट सिटी च्या नावाखाली कल्याण डोंबिवली महापालिकेचे मुख्यालय कचोरे गाव येथे हलविण्याचे प्रयत्न, कल्याण स्टेशन समोरील एसटी डेपो गांधारी गावाकडे हलविण्याचे षडयंत्र, कल्याण न्यायालय (कोर्ट) हे ही बारावे गाव व इतर कुठेतरी हलविण्याचे षडयंत्र असा आरोप करत राष्ट्रवादीने कल्याण स्टेशन बाहेर सह्यांची मोहीम राबविली होती.
यावेळी प्रदेश सरचिटणीस रमेश हनुमंते, माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे, जिल्हाध्यक्ष डॉ. जगन्नाथ ( आप्पा ) शिंदे,कार्याध्यक्ष डॉ.वंडार पाटील, जिल्हा उप्पाध्यक्ष वल्ली राजनडोंबिवली शहरअध्यक्ष सुरेश जोशी,संदीप देसाई, महिला जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड,संगीता मोरे, कल्याण विधानसभा अध्यक्ष सुनीता देशमुख, विधानसभा सरचिटणीस पांडुरंग चव्हाण, सोशल मिडीया जिल्हा अध्यक्ष निरंजन भोसले, माजी नगरसेवक उमेश बोरगावकर,जे.सी.कटारिया, गोवर्धन भोईर, संजय पाटील आदींसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments