कल्याण डोंबिवली ग्रामीण भागात पाणी टंचाई.. एमआयडीसीचे बांधलेलला जलकुंभ विनावापर

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) १९८० साली बांधण्यात आलेले जलकुंभ विनावापर पडून राहिल्याने प्रशासनाच्या या बेजबाबदार कामावर नागरिक नाराज झाले आहेत.
डोंबिवली एमआयडीसी भागात घरडा सर्कल जवळ २० लाख लिटर क्षमतेच्या  जलकुंभावर करोडो रुपये खर्च केले होते.याबाबत जागरूक नागरिक राजू नलावडे यांनी ही बाब उजेडात आणत  जलकुंभ विषयी एमआयडीसीकडे विचारणा केली.
    

सदर जलकुंभ साठी 4850 चौरस मीटरचा हा भूखंड राखीव असून याच जागेवर नवीन जलकुंभ बांधण्याचे प्रस्तावित आहे अशी फक्त उत्तरे देऊन एमआयडीसी 
वेळकाढूपणा करत असल्याचे नलावडे यांनी सांगितले. हा जलकुंभ त्यावेळीच वापरला असता किंवा दुरुस्ती करून अथवा त्याच जागेवर नवीन बांधला असता तरी येथील ग्रामीण भागातील पाणी टंचाई काही प्रमाणात कमी झाली असती. 


याच जलकुंभ भूखंडावर अनेकांची नजर असून हा किंमती व मध्यवर्ती ठिकाणावर असलेला भूखंड कसा मिळवता येईल असा काही विकासक/बिल्डर इत्यादींचा प्रयत्न चालू असल्याचे नलावडे यांनी स्पष्ट केले.


 डिसेंबर 2021 मध्ये डोंबिवली एमआयडीसी व ग्रामीण परिसरात अनधिकृत नळजोडण्या एकूण 1993 असून पाणी गळतीचे प्रमाण एकूण 14% असल्याचे  एमआयडीसीने माहिती अधिकारात उत्तर दिले. 


जरी हे अनधिकृत नळजोडण्या आणि पाणी गळतीचे प्रमाण कमी केले तरी बरीचशी पाणी टंचाई दूर होईल असे  नलावडे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments