हेमा नरेंद्र पवार यांच्या व्यवसाय व रोजगार मेळाव्यास तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांसाठी नागरिक व व्यापाऱ्यांची नोंदणी


कल्याण :  कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमा नरेंद्र पवार यांनी आयोजित केलेल्या व्यवसाय व रोजगार मेळावा तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांसाठी आयोजित केलेल्या उपक्रमाला कल्याणमधील तरुण, नागरिक व व्यापाऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे.


काल भारतीय जनता पार्टी, जनसंपर्क कार्यालय पारनाका येथे भारतीय जनता पार्टी याप्रसंगी कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता पवार व इतर मान्यवरांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. 


याप्रसंगी भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश सहसंयोजक शिवाजी आव्हाड, कल्याण शहर सचिव संजय कारभारी, प्रभाग क्र.२ वार्ड अध्यक्ष मेघनाथ भंडारी,  सदा कोकणे,  मिलिंद सिंग, आदि. मान्यवर पदाधिकारी, विविध कंपन्यांचे अधिकारी  स्वाती डोंबरे, अजय नागपूरे व टीम तसेच मोठ्या संख्येने युवक, नागरिक उपस्थित होते.


रिलायन्स व इतर नामांकित कंपन्यांमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळणार असून १२ वी व पदवीधर उमेदवारांनी या कॅम्प चा फायदा घेण्याचे आवाहन कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले.

Post a Comment

0 Comments