डोंबिवलीत चहाबाज चहाच्या दुकानाचे उद्घाटन

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) गुळाचा चहा त्याचप्रमाणे विविध मसाल्यांचे चहा चहाबाजांना डोंबिवली शहरात मिळत असून आता आणखी एक "चहाबाज" नावाच्या चहाच्या दुकानाचे उद्घाटन अक्षयतृतीयाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले. गजानन व्यापारी, अरुणा व्यापारी आणि शशी राजभर यांनी पूर्वेकडील केळकर रोड येथील गणेशकृपा इमारतीमध्ये "चहाबाज" चहाचे दुकान थाटले असून पहिल्याच दिवशी उद्घाटन दरम्यान शहरातील चहा शौकिनांनी "चहाबाज" चहाचा आस्वाद घेतला. 


         या चहाबाबत चहाच्या चवीबाबत सांगतांना व्यापारी म्हणाल्या, चहाबाज चहात गवतीचहाची वेगळी चव आणि पूर्ण दुधाचा चहा ही चहाबाजची खासियत आहे. आयुर्वेदिक गवती चहा फार महत्व आहे. विशेष म्हणजे हा चहा खिशाला परवडेल याची काळजी घेण्यात आली आहे. 


           चहाबाज चहाच्या दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी शहरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मंडळींनी चहाचा आस्वाद घेतला. यावेळी  माजी नगरसेवक रवी पाटील यांनीही सदिच्छा भेट दिली.

Post a Comment

0 Comments