ती टोळी करायची वजन काट्यात इलेक्ट्रोनिक चीप लावून स्टील चोरी सात अटक, चीप बनविणारा इंजिनिअर फरार


डोंबिवली ( शंकर जाधव ) चोरी करताना तांत्रिक बाबींचा वापर करून न कळणारी चोरी उघडककीस आणण्यास मानपाडा पोलिसांना यश आले आहे.वजनकाट्याच्या खालच्या बाजूला इलेक्ट्रोनिक चीप लावून स्टील चोरून ते भंगारवाल्यांना विकून करोरो रुपये कमविणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकून अटक केली आहे. यातील चीप बनविणारा इंजिनिअर फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. भारतभर कुठल्या ठिकाणी वजनकाट्यांना चीप लावलेल्या आहेत याचा पोलीस तपास करत आहेत.


      पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन दला चौरे ( वाहन चालक ,रा दस्तापुर, मुपो बोडके, ता. मंगळुरपीर, जि.वाशिम, २) दिदिरसिंग मंगलसिंग राजु ( वाहन मालक ) रा. टागोरनगर, विक्रोळी, मुंबई, ३) दिलबागसिंग हरबन्ससिंग गिल (वाहन मालक व चालक) टागोरनगर, विक्रोळी (मुंबई) फिरोज मेहबुब शेख ( इलेक्ट्रॉनिक चीप बसविणारा) रा. फिरदोस चाळ ( रा. मुंब्रा) शिवकुमार उर्फ मिता गिलई चौधरी ( माल विकत घेणारा ) (रा. कारजालाड, जि.वाशिम), हरविंदरसिंग मोहनसिंग तुन्ना ( गाडी मालक ) टागोरनगर, विक्रोळा पुर्व, हरजिंदरसिंग बलवीरसिंग राजपुत ( चालक ) गांव मजिठा ता जि. अमृतसर, पंजाब असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 


        तर इलेक्ट्रॉनिक चॉप लावणारा इंजिनिअर मानसी सिंग या फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपी फिरोज मेहबुब शेख याच्यावर विविध पोलीस ठाण्यात भंगारचोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. फिर्यादी मनिष नरेश पमनानी यांनी ९ मे रोजी रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून अटक आरोपींवर भादंवि ४२०,४६५ ४६८, ४०७,३४ सह १२० (व) प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही टोळी वजनकाटयास इलेक्ट्रॉनिक चाप लावून रिमोटच्या आधारे मालाचे वजन वाढविण्याचे काम करतात. 


        त्यामुळे स्टील कंपनीकडून बांधकाम व्यवसायीक यांचेकडे आलेले स्टील हे ट्रान्सपोर्ट कंपनीचे चालक व मालक यांना हाताशी धरून कंपनीतून स्टीलचा माल निघल्यानंतर त्यातील काही माल भंगार व्यवसायीकांस विकून उर्वरीत माल हा बांधकाम व्यवसायीक यांचे वजनकाट्यावर आणल्यावर रिमोट कंट्रोलव्दारे मालाचे वजन वाढवून कमी प्रमाणात माल बांधकाम व्यवसायीक यांना पुरवून स्वतःचा आर्थिक फायदा करून येत असल्याचे सिद्ध झाले आहे.अटक आरोपीकडे पोलिसांनी चौकशी केली असता जालना येथील भंगार व्यवसायीक यांचेकडे चोरीचा माल विकल्याची माहिती समोर आली आहे.


       या गुन्ह्यात एकूण सुमारे दोन कोटी आठ लाख किमतीचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यात मालवाहू ट्रक, स्टील, इलेक्ट्रॉनिक चीप, रिमोट, मोबाईल फोन असा मुद्देमालआहे.पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त  सचिन गुंजाळ, जयराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वपोनि शेखर बागडे, सपोनि सुनिल तारमळे, सपोनिरी अविनाश वनवे, सपोनिरी. ज्ञानोबा सुर्यवंशी, पोना प्रशांत वानखेडे, अशोक कोकोडे, सुशांत तांबे, पोशि संतोष वायकर, पोशि ताराचंद सोनवने,महेंद्र मांझ, पोहवा राजेंद्र खिलारे, पोहवा विजय कोळी, पोना प्रविण किनरे, दिपक गडगे, भारत कांदळकर, महादेव गवार, यल्लप्पा पाटील आदींनी कामगिरी बजावली.  

Post a Comment

0 Comments