कल्याण मधील शालेय विद्यार्थ्यांचा राज्य पुरस्काराने गौरव


कल्याण :  १ मे महाराष्ट्र दिन रोजी साकेत मैदानठाणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होली क्रॉस इंग्लिश हायस्कूल नांदिवली कल्याण, या शाळेतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्काऊट गाईडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्य पुरस्कार या परीक्षेमध्ये शाळेतील ६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्राविण्य प्राप्त केले. यसाठी पालकमंत्र्यांच्या हस्ते स्काऊट अश्विन अर्जुन नायर यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 


तसेच राज्य पुरस्कार परीक्षेमध्ये  उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सुजित चौधरीप्रथमेश ढोणेआदित्य होळकरहर्ष निंबाळकरयश पाल या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांना स्काऊट मास्टर विजेता  रहाटे व मुख्याध्यापिका यशोदा नाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments