कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक आरक्षण बपंर सोडत जाहीर इच्छुकांचा संभ्रम; पालिका घेणार प्रशिक्षण शिबीर


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आज मंगळवार ३१ मे रोजी रोजी मनपा आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आचार्य अत्रे रंगमंदिरात आरक्षण सोडत पार पडली.कल्याण महानगर पालिका आगामी पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक होणार असून मंगळवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. ही निवडणूक प्रथमच पॅनल पद्धतीने होणार असून १३३ सदस्य निवडीसाठी ३ सदस्य  ४३ पॅनल ४  सदस्य १ पॅनल असे ४४ पॅनल मधून  १३३ जागांवर निवडणूक घेतली जाणार आहे.मगंळवारी १३३ जागा मधून अनुसूचित जातीसाठी १३ आणि अनुसूचित जमाती साठी ४ असे १७ प्रभाग आरक्षित असल्याने यातील अनुसूचित जाती  महिला वर्गासाठी ७ आणि अनुसूचित जमाती साठी २ असे ९ जागांसाठी तर उर्वरित ११६ जागांपैकी ५० टक्के आरक्षण असल्यांने ५८ जागांचे आरक्षण सोडत मंगळवारी काढण्यात आली. श्री गजानन विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत सोडतीच्या चिठ्ठी काढण्यात आली.ही निवडणूक मध्ये पॅनल पद्धतीने घेण्यात येणार असल्याने एका पॅनल मध्ये ३ सदस्य निवडून देण्याचे असले तरी पॅनलची रचना दोन ते तीन किंवा त्याहुन अधिक प्रभागांना एकत्र प्रभाग रचना केल्याने अ, क नुसार वार्डची नावे दिले जातील असे इच्छूकांची अपेक्षा होतीमात्र केवळ अ, ब, क ची वार्ड रचनाआरक्षित वर्गमहिला वर्ग आणि खुला वर्ग मधील सदस्य निवडीसाठी केली असल्याने वार्ड नावाने कोणताच अधिकार राहिला नसल्याने माजी नगरसेवकांना त्याचा फटका बसला आहे. पॅनल मधील सदस्यांना कुठल्याही भागातून उभे राहता येणार आहे. याचा फायदा राजकीय पक्षांना होणार असून छोटे पक्ष आणि अपक्ष इच्छूक उमेदवार भरडले जाणार आहे.अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्रमांक 5, 6, 19, 21 असे प्रभाग आरक्षित ठेवण्यात आले असून यातील 6 ( ब) 19 (ब) अनुसूचित जमाती महिला साठी राखीव झाल्याचे सोडत द्वारे घोषित करण्यात आले. अनुसूचित जाती साठी प्रभाग 2 , 4 , 6 , 7 , 15 , 17 , 19 , 20 , 22 , 23 , 25 43 आणि 44 असे एकूण  13 प्रभाग  आरक्षित ठेवण्यात आले आहेत त्यातील 4 (अ) ,6 ( अ ) ,7 ( अ )

17 ( अ ) , 20 ( अ ) , 23 ( अ ) आणि 43 ( अ ) असे सात जागा अनुसूचित महिलांसाठी सोडत द्वारे जाहीर करण्यात आले.सर्व साधारण महिला साठी एकूण 58 जागा आरक्षित असल्याने या 58 जागांच्या सोडत काढण्यात आली. त्यामध्ये प्रभाग क्रमांक  1 (अ),  2 (ब) , 3 (, ), 4 ( ब),  5 (ब), 7 (ब), 8 (ब) 9 ( अ) 10 (ब) 11 (ब) 12 (अ), 13 (ब) 14 (अ), 15 (ब), 16 (अ), 17 (ब), 18 (अ), 20 ( ब),  21 ( ब) 22 ( ब),  23 (ब),  24 (ब), 25 (ब),  26 (अ), 27 (ब), 28 (ब),  29 (अ) 30 (ब), 31 (अ),  32 (ब),  33 (अ) 34 (ब),  35 (,ब) 36 (ब) 37 (अ),  38 (अ),  39 (ब) 40 (अ) 41 (ब), 42 (अ) 43  (ब),  44 (ड) अशा 58 जागा सर्व साधारण महिला वर्गासाठी सोडती द्वारे आरक्षित ठेवण्यात उर्वरित 58 जागा खुल्या वर्गासाठी असणार आहे.


67 प्रभागच्या सोडतीमुळे निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला असून सोडती पासून इच्छूकांची मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.प्रभाग रचना संभ्रम 

निवडणुक सदस्य पॅनल पद्धतीने होणार असल्याने एका पॅनल मध्ये सदस्य निवडून द्यायचे असल्याने प्रभागाच्या नावांना अर्थ राहिला नाही. तीन प्रभागाचा एक पॅनल केल्याने मागील निवडणूक मधील विजयी झालेल्या नगरसेवकांसमोर राजकीय पेच निर्माण झाले आहे.

कोणत्या जागेतून निवडून यावे व पक्षाने आपल्याला उमेदवारी द्यावी यासाठी तीन उमेदवारांना डोकेदुखी वाढली आहे.


 

पॅनल पद्धतिने राजकीय पक्षाला फायदा तर छोट्या पक्ष व अपक्ष उमेदवारांना फटका बसला आहे. एक प्रभाग सदस्य निवडून द्यायचे असल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना उमेदवारी देणार असल्याने अपक्ष आणि छोट्या पक्षांना उमेदवार शोधण्यात डोकेदुखी ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments