डोंबिवलीतील स्वामी विवेकानंद रात्र महाविद्यालयात स्वामी विवेकानंद सेंटर फॅार एक्सलंसचे उद्घाटन


डोंबिवली ( शंकर जाधव ) १ मेमहाराष्ट्र दिनाच्या ६२ वा वर्धापनदिनाचे औचित्य साधुन राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित स्वामी विवेकानंद रात्र कला व वाणिज्य महाविदयालय ( डोंबिवली) च्या रौप्य महोत्सवी वर्षीच्या शुभारंभाच्या  समारंभात  महाविद्यालयात स्वामी विवेकानंद सेंटर फॅार एक्सलंसचे उदघाटन करण्यात आले.



 या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी  शशिकांत कर्डेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद संस्थेचे अध्यक्ष डॅा. सुभाष वाघमारे यांनी भूषविले. कार्यक्रमास संस्थेचे कार्यवाह संजय कुलकर्णी तसेच संस्थेचे पदाधिकारी व शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचे ग्रंथपाल डॅा.श्रीनिवास आठल्ये यांनी व त्यांच्या सहकलाकार विद्यार्थी वर्गाने मुंबई विद्यापिठ गीताने सुरुवात केली.



यांस महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक - दिपक सांगलीकर यांनी तबला साथ केली.याप्रसंगी स्वामी विवेकानंद रात्र कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॅा.अनुजा पळसुले-देसाई यांनी प्रास्ताविक केले.याप्रसंगी बोलताना त्यांनी महाविद्यालयाचा २५ वर्षांचा आढावा आपल्या प्रस्तावनेत घेतला व या महाविद्यालयाने कष्टकरी व श्रमिक विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाची सोय केली. जवळजवळ २२ हजार विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयातून आपले पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. 



महाविद्यालयात नव्याने सुरु होत असलेल्या स्वामी विवेकानंद सेंटर फॅार एक्सलंस विषयीची माहीती दिली. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयात आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमांची माहीती थोडक्यात दिली. संस्थेचे कार्यवाह  कुलकर्णी यांनी आपले विचार मांडताना म्हणाले, १९६८ मध्ये संस्थेच्या संस्थापक सदस्यांनी लावलेले ज्ञानप्रसाराचे बीज आज वटवृक्ष होताना दिसत आहे. महाविद्यालयाने विद्यार्थी वर्गाला जीवन जगण्यासाठी ज्ञानाने सशक्त करण्याच ध्येय घेतल आहे व ते व्यवस्थित पार पाडत आहेत.



या कार्यक्रमाचे अध्यक्ष व राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॅा.सुभाष वाघमारे यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमाचे कौतुक केले. स्वामी विवेकानंद रात्र महाविद्यालय ज्या ध्येयाने सुरु केले होते, त्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहे व संस्था ह्या महाविद्यालयाच्या सर्व उपक्रमांना साथ देतच राहील असे सांगितले. कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॅा. वाघमारे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या बोधचिन्हाचे अनावरण देखील करण्यात आले



कार्यक्रमाच प्रमुख आकर्षण सुप्रसिध्द निवेदिका व वक्त्या अनघा मोडक यांच व्याख्यान  'जगण्याचं गाण होतानाहा अनुभव या विषयावर आयोजित केले. मोडक यांनी आपल्या व्याख्यानात त्यांच्या जीवनातील विविध अनुभव सांगत रडायच नाही लढायच लढताना सुध्दा हसायचं व आपल जीवन जगायचं हे सांगितले कार्यक्रमात सुत्रसंचलन ग्रंथपाल डॅा.श्रीनिवास आठल्ये तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी  शशिकांत गाणार यांनी सांभाळली .विद्यार्थीनी माधुरी रनाळकर  यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments