ऐरोस्केटो बॉलच्या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद


कल्याण : बोरीवली स्केटिंग स्पोर्टस क्लबपार्थ इंडिया स्पोर्टस फाउंडेशन आणि ऐरोस्केटोबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संयुक्त रित्या आयोजित केलेल्या खुल्या ऐरोस्केटोबॉल स्पर्धेत रेस स्केटींग अॅकॅडमीइंडिया रोलर स्केट्ससाशा स्केटींग स्कूल  अॅकॅडमीऐरोस्केटोबॉल मुंबई उपनगर या संघानी सहभाग नोंदवला होता.


रेस स्केटिंग अॅकॅडमी व इंडिया रोलर स्केट्स या झालेल्या सामन्यामध्ये  इंडिया रोलर स्केट्स अॅकॅडमी या संघाने ९ गुणाने रेस स्केटींग अॅकॅडमी या संघावर बाजी मारली. इंडिया रोलर स्केट्स अॅकॅडमी कडून क्रिस शाहहरर्शित सुरानारिद्या शाहहिया वाजाविहांग मिस्त्रीरितीशा मोटेध्रुमिल कपाडियाचांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. तसेच रेस स्केटिंग अॅकॅडमी कडून समर्थ चव्हाणसोनाक्षी चव्हाणकाव्या पटेलसार्थक पांगरे ह्या खेळाडूंनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.


रेस स्केटिंग अॅकॅडमी व साशा स्केटिंग स्कूल अॅकॅडमी यांच्यात झालेल्या स्पर्धेत रेस स्केटिंग अॅकॅडमी तर्फे लेख पटेलविहांग केणीप्रिना देसाईजय मंधारेवर्णिका भार्यवालदुनिका रजक ह्यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. साशा स्केटिंग अॅकॅडमी कडून विहांग गोयलखुशाल रेवडेकरश्रीधर नाडारपियर बांगरचित्रा डांगेवेरुशका उमेशसाशा डांगे ह्यांनी आपल्या खेळाचे उत्कृष्ठ प्रदर्शन केले.


ऐरोसस्केटोबॉलची स्पर्धा संपन्न होण्याकरिता प्रामुख्याने आमदार सुनील राणे यांनी सहकार्य केले. तसेच वरुण श्रीकारप्रथमेश चिंचणकरराज सिंगविजय डांगेभामीनी शाह आदींच्या सहकार्याने ही स्पर्धा संपन्न झाली. ऐरोसस्केटोबॉल संघटने कडून सुनील कॉड्रसअलेक्स चेट्टीश्याम चौधरी यांनी निरीक्षक म्हणून काम पाहीले. 


ऐरोसस्केटोबॉल हा खेळ भारतातुन उगम होऊन आता २६ ते २८ राज्यात खेळला जातो. स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाने देखिल या खेळास मान्यता देवून ह्याचा नॅशनल ओरिएंटेशन शिबिर आयोजित केले होते. हा खेळ लवकरच महाराष्ट्रात देखिल शालेय स्तरावर सामिल होणार असल्याची माहिती सुनील क्रॉड्रस यांनी दिली.

Post a Comment

0 Comments