इन्फिनिक्सने नोट १२ सिरीज लॉन्च केली


सर्वोत्तम कार्यक्षमता व उच्च दर्जाची डिझाइन असलेला सर्वांगीण डिवाईस ~

मुंबई, २३ मे २०२२: इन्फिनिक्स या ट्रांसियॉन ग्रुपच्या प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्डने आज भारतात बहुचर्चित नोट १२ सिरीजचे अनावरण केले आहे. प्रिमिअम व शक्तिशाली फोन्स असलेले नोट १२ व नोट १२ टर्बो अनुक्रमे २७ मे व २८ मे पासून फ्लिपकार्टवर उपलब्ध असतील.


नोट १२ व नोट १२ टर्बोमध्ये सर्वोत्तम वैशिष्ट्ये, आकर्षक डिस्प्ले, उच्च दर्जाचे गेमिंग तंत्रज्ञान, शक्तिशाली प्रोसेसर, आधुनिक ओएस आणि विशाल क्षमतेची बॅटरी आहे, ज्यामधून ग्राहकांना सर्वसमावेशक स्मार्टफोन अनुभव मिळेल. नोट १२ दोन ४ जीबी (७ जीबीपर्यंत विस्‍तारित)/ ६४ जीबी आणि ६ जीबी (११ जीबीपर्यंत विस्‍तारित)/ १२८ जीबी मेमरी व्हेरिएण्ट्समध्ये, तसेच ज्वेल ब्ल्यू, फोर्स ब्लॅक, सनसेट गोल्ड या तीन आकर्षक रंगांच्या व्हेरिएण्ट्समध्ये येईल. नोट १२ टर्बो ८ जीबी (१३ जीबीपर्यंत विस्तारित) / १२८ जीबी स्टोरेज आणि सफायर ब्ल्यू, फोर्स ब्लॅक व स्नोफॉल या तीन आकर्षक रंगांच्या व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल.


इन्फिनिक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिश कपूर म्‍हणाले, "इन्फिनिक्स नोट सिरीजसह आमचा ग्राहकांसाठी प्रिमिअम व उच्च दर्जाचे डिवाईस सादर करण्‍याचा प्रयत्न आहे, जे आकर्षक डिझाइन, सर्वोत्तम अनुभव व एकसंधी कार्यक्षमतेसंदर्भात इतरांपेक्षा वरचढ ठरतात. नोट १२ सिरीजच्या माध्यमातून आम्ही तडजोड न करणाऱ्या डिवाईसचे परिपूर्ण संतुलन तयार करण्याचा प्रयत्न केला आहे, जो गेमिंग-सक्षम असण्यासोबत किफायतशीर आहे."


प्रमुख वैशिष्ट्ये:


उच्चस्तरीय डिस्प्ले: ६७ इंच एफएचडी+ एएमओएलईडी डिस्प्ले, ९२ टक्‍के स्क्रिन-टू-बॉडी रेशिओ, १०० नीट्स सर्वोच्च ब्राइटनेस आणि १८० हर्टझ टच सॅम्प्लिंग रेट


सडपातळ, वजनाने हलका व सोईस्कर: वजन फक्त १८४.५ ग्रॅम, तर नोट १२ टर्बो फक्त ७.९ मिमी सडपातळ आहे, नोट १२ ची जाडी ८ मिमी आहे, सुलभ कार्यसंचालनांसाठी मल्टीफंक्शनल साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर


पॉवर-पॅक कार्यक्षमता: अँड्रॉईड ११ सह एक्सओएस१०.६वर संचालित नोट १२ मध्ये प्रगत हेलिओ जी८८ प्रोसेसर आहे, नोट १२ टर्बो अँड्रॉईड १२ सह एक्सओएस१०.६ वर संचालित आहे आणि हेलिओ जी९६ प्रोसेसर आहे


अपवादात्मक कॅमेरा अनुभव: दोन्‍ही डिवाईसमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा लेन्ससह एफ/१.६ लार्ज अर्पेचर, सेकंडरी लेन्ससह परिपूर्ण व्यापक फोटोज कॅप्चर करण्यासाठी २ मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि एआय लेन्स आहे.


मेमरी व्हेरिएण्ट्स: नोट १२ - ४ जीबी (व्हर्च्युअल रॅमच्या माध्यमातून जवळपास ७ जीबीपर्यंत विस्तारित)/६४ जीबी आणि ६ जीबी (जवळपास ११ जीबीपर्यंत विस्तारित)/१२८ जीबी इंटर्नल स्टोरेजसह एलपीडीडीआर४एक्स रॅम, नोट १२ टर्बो - ८ जीबी (जवळपास १३ जीबीपर्यंत विस्तारित)/१२८ जीबी स्टोरेजसह एलपीडीडीआर४एक्स रॅम


विशाल क्षमतेची बॅटरी: ५००० एमएएच बॅटरी असलेल्या दोन्ही डिवाईसेसमध्ये ३३ वॅट फास्ट चार्जिंगसह टाइप सी केबल आहे


नोट १२ ११,९९९ रूपये (४+६४ जीबी) आणि १२,९९९ रूपये (६+१२८ जीबी) या कमी किंमतीमध्ये उपलब्ध असेल, तर नोट १२ टर्बो १४,९९९ रूपये (८+१२८ जीबी) या किंमतीमध्ये उपलब्ध असेल. अॅक्सिस बँक ग्राहक अॅक्सिस बँक क्रेडिट व डेबिट कार्डच्या माध्यमातून खरेदीवर १,००० रूपंयाच्या त्वरित सूटचा लाभ घेऊन शकतात. 


तसेच ते प्रतिमहिना २००० रूपये इतक्या कमी नो-कॉस्ट ईएमआयमध्ये नोट १२ (६+१२८ जीबी) खरेदी करू शकतात. इतर ग्राहकांसाठी इन्फिनिक्स सर्व बँकांवर (अॅक्सिस बँकेसह) ३ व ६ महिने नो-कॉस्ट ईएमआय, बजाज फिनसर्व्‍ह ईएमआय आणि फ्लिपकार्ट पे लेटरच्या माध्यमातून सर्व नोट १२ (४ जीबी/६ जीबी/८ जीबी) मेमरी व्हेरिएण्ट्स खरेदी करण्याची सुविधा देत आहे.

Post a Comment

0 Comments