कळवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज कळवा प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आले. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.


           या कारवाईतंर्गत कळवा प्रभाग समिती येथील शंकर मंदिर शेजारी, कळवा येथे ७ कॉलम तोडण्यात आले. कळवा नाका, जुम्मा मस्जिद येथे ६ कॉलम तोडण्याची कारवाई करण्यात आली. सुदाम सोसायटीच्या बाजूला, कावेरी सेतू येथील बांधकामाचे स्लॅब व कॉलम कट करण्यात आले. कळवा मच्छी मार्केट जवळ, बांधकामाचे स्लॅब तोडण्यात आले. मयूर हॉटेल मागे, खारीगाव येथील बांधकामाचे स्लॅब व कॉलम तोडण्यात आले तसेच रवींद्र हॉटेल मागे, खारीगाव येथील बांधकामाचे स्लॅब व कॉलम निष्कासित करण्यात आले.


     सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त जी.जी. गोदेपुरे, सहाय्यक आयुक्त (सनियंत्रण व समन्वय) महेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.

Post a Comment

0 Comments