बिल्डरने पाणी २४ तास सांगून केली फसवणूक.. देसले पाड्यातील स्थानिकांचा मोर्चा

डोंबिवली  ( शंकर जाधव) शनिवारी कल्याण ग्रामीण मधील संदीप गावाजवळ खदानीत पाणी भरताना एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर दुसऱ्याच दिवशी रविवारी देसलेपाड्यातील स्थानिकांनी बिल्डरच्या कार्यालयावर मोर्चा काढला.बिल्डरने २४ तास पाणी देता असे खोट सांगितल्याबद्दल नागरिकांनी जाब विचरण्यासाठी लोकशाही मार्गाने केलेले हे आंदोलन होते.
    

 देसलेपाडा परिसरात एकूण १२ सोसायटी असून या सोसायटीत महानगरपालिकेचे २४ तास पाणी असेल असे आश्वासन दिले होते.प्रत्यक्षात पाणी टंचाईचा सामना करता येत असल्याने वैतागलेल्या नागरिकांनी या इमारतीच्या 60 ते 65 रहिवाशांनी बिल्डरच्या कार्यालयावर मोर्चा काढला.आठ दिवसात पाणी व्यवस्थित आले नाही तर पालिका आयुक्तांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढू असा इशारा मोर्चेकरांनी दिला.

Post a Comment

0 Comments