कल्याण मध्ये प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कुस्त्यांचे जंगी सामने अजिंठा फाउंडेशनचे आयोजन १५ मे रोजी होणार कुस्त्यांचा थरार

 


कल्याण : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त कल्याण मध्ये प्रथमच पुरूष व महिलांचे कुस्त्यांचे जंगी सामन्यांचे आयोजन अजिंठा फाउंडेशनचे अध्यक्ष अजय सावंत यांनी केले आहे. 


येत्या १५ मे रविवारी रोजी कल्याण पश्चिमेतील  माता रमाई आंबेडकर नगर,  सम्राट अशोक चौक, एम.के. कॉलेज रोड,  माता रमाई आंबेडकर उद्यानच्या बाजुला सायंकाळी ३ ते ७ वाजेपर्यंत हे सामने होणार आहेत. या सामन्यांमध्ये विविध ठिकाणाहून कुस्तीपटू सहभागी होणार असून कुस्त्यांचा थरार रंगणार आहे. 


या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी  अनिल  धनगर 88792 47755,  सुभाष ढोणे , 80970 35077 यांच्याशी संपर्क करण्याचे आणि जास्तीत जास्त कुस्ती प्रेमींनी सामने पाहायला येण्याचे आवाहन या स्पर्धेचे आयोजक अजय सावंत यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments