केडीएमसीतर्फे स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या जयंती दिनी अभिवादन


कल्याण : स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या जयंती दिनी आज महापालिकेतर्फे  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  महापालिका मुख्यालयात,  उपायुक्त अतुल पाटील  यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 


यावेळी उपस्थित  सहा. आयुक्त सुधीर मोकल,  माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांनी देखील स्वातंत्र्यवीर वि. दा.सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले. तसेच महापालिका भवनातीलस्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर सभागृहातील त्यांच्या तैलचित्रास उपायुक्त अतुल पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments