डोंबिवलीत शिवसेनेच्या वतीने हुतात्मांना मानवंदना

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. ह्या चळवळीत हुतात्मा प्राप्त झालेल्या १०६ वीर लढवव्या मानवंदना शिवसेनेच्या वतीने डोंबिवलीत मानवंदना देण्यात आली. 


१ मे महाराष्ट्र दिनी  ओमकार शाळा चौक, ९० फिट रोड,ठाकुर्ली शिवसेना ठाकुर्ली विभाग तर्फे आयोजित कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख - राजेश कदम साहेब, शहर प्रमुख - राजेश मोरे  , विधानसभा संघटक - तात्या माने , युवा सेना शहर अधिकारी  सागर जेधे,  उपशहरसंघटक दीपक भोसले, विभागप्रमुख विजय चौधरी उपविभागप्रमुख संजय भोसले, संजय चौधरी, प्रथमेश खरात, शाखाप्रमुख
सचिन जोशी , गिरीश काळण, प्रवीण पवार,  माजी नगरसेवक (रत्नागिरी ) सुधीरभाई लोध , उजाला पाटील, युवासेना वैभव राणे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments