चाईल्ड लाइन ही राष्ट्रीय आपत्कालीन मोफत फोन सेवा आहे. जी संकटग्रस्त 0 ते 18 वयोगटातील बालकांसाठी मदत करते. हा केद्रीय महिला व बालविकास मंञालयाचा प्रकल्प आहे. चाईल्ड लाईन ही स्वयंसेवी संस्था, अशासकीय संस्था शासकीय रुग्णालय यांच्या समन्वयाने कार्य करते. चाईल्ड लाइन ही संपूर्ण भारतात ,शहरात व गावपातळीवर तसेच भारतातील प्रमुख रेल्वे स्थानकात कार्यरत आहे. कल्याण रेल्वे स्टेशन येथे ही चाईल्ड लाइन स्वयंसेवी संस्था कार्यालय होम प्लॅटफॉर्मवर आहे.
कल्याण येथील चाइल्ड लाइन स्वयंसेवी संस्था महिला स्वयंसेविका प्रतिभा पोळ आणि सुर्वणा दाभोलकर यांनी रिक्षा स्टॅण्ड वर उपस्थित रिक्षा चालकांना तुम्ही एखादे बालक एकटे पहाल त्याला मदतीची गरज आहे. तुम्ही एखादा बालकामगार पहाल तुम्ही एखाद्या लहान मुलाला भिक मागताना पहाल, एखादे लहान बालक ज्याला निवाऱ्याची गरज आहे एखादे बालक आजारी आहे. एखादे बालक बेवारस आहे. एखाद्या बालकाचे शोषण झाले आहे. बालकावर कोणत्याही प्रकारचे अन्याय झाले आहे. अशा बालकांची मदत करण्यास चाईल्ड हेल्पलाइन टोल फ्री क्रमांकावर 1098 यावर फोन करा आपली माहिती गुपित ठेवली जाईल अशी माहिती देऊन रिक्षा चालकांमध्ये जनजागृती केली.
चाईल्ड लाईन स्वयंसेवी संस्थेच्या चांगल्या कामाला मदत करण्याचे आवाहन रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी रिक्षा चालकांना केले. या प्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष जितेंद्र पवार यांनी बोलताना सांगितले की रिक्षा चालक नित्यरोज प्रवासी वाहतूक सेवा बजावत असतात चाईल्ड लाईन स्वयंसेवी संस्थेच्या कामाला व स्वंयसेवकाना रिक्षा चालक नक्कीच मदत करतील अशी ग्वाही दिली. या प्रसंगी बहुसंख्य रिक्षा चालक उपस्थित होते.
0 Comments