मैत्रकूलच्या ५ व्या वर्धापन दिनी संकल्प मेळाव्याचे आयोजन

कल्याण : कल्याण जवळील बापगाव येथे असलेल्या मैत्रकूलच्या ५ व्या वर्धापन दिना निमित्त संकल्प मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक २९ मे रोजी केले असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रेया निकाळजे यांनी केले आहे.


  वस्तीतील गोर गरीब व होतकरू विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घ्यावे यासाठी कायम धडपडणारे आणि आपल्या खांद्याला झोळी लावून त्यात झोळीत फळाखडूपुस्तके आणि खेळणी घेऊन फिरणारे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोर जगताप यांनी मुंबईठाणे आणि पालघर येथे अनेक बागशाळावस्तीशाळा चालवल्या. कालांतराने त्यांना क्षात आले की विद्यार्थ्यांना पूर्णवेळ मार्गदर्शनाची गरज आहेही गरज ओळखून त्यांनी १० मे २०१७ रोजी विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणासाठी व सर्वांगीण विकासासाठी गुरुकुल पध्दतीने मैत्रकूल सुरू केले.



 मैत्रकूल बघता बघता ०५ वर्षाचे झाले. मैत्रकूल "जीवन विकास केंद्र" ही अत्यंत आगळी वेगळी संकल्पना किशोर जगताप यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या मैत्रकूल ने  असंख्य गोरगरीबहोतकरूध्येयवादी  विद्यार्थ्यांना एका अर्थाने विद्येच्यामायेच्यामाणुसकीच्या सावलीखाली मोठं केलं आहे करत आहे आणि  करत राहील. या सर्व कार्यात त्यांची सक्रिय साथ दिली ते छात्रशक्ती संस्थेच्या अध्यक्ष राजप्रिया बडेकर यांनी. 


 एकेकाळी एक टोप, वाटी, चमचाताट घेऊन कल्याण मधील बापगाव येथील गायकर कंपाऊंड मध्ये ह्या प्रकल्पाची सुरुवात झाली. आधी १५ मग ३० नंतर ५६ विद्यार्थी आणि बघता बघता कल्याणपुणेरायगड, सातारा अश्या विविध ठिकाणी मैत्रकूलच्या शाखा उभा राहिल्या. सामाजिक भान असलेल्यामाणुसकी जपणाऱ्या अनेक लोकांनी  आपली जागा काही वर्षाच्या करारावर देऊन  इथे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडावे यासाठी सहकार्य केले अशी माहिती मैत्रकूल प्रमुख संचालक आशिष गायकवाड यांनी दिली.


 

       येत्या २९ मे ला  संकल्प मेळावा २०२२  चे आयोजन मैत्रकूल जीवन विकास केंद्र कल्याण पश्चिम येथे करण्यात आले आहे. ज्यात मैत्रकूल च्या पुढील कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. ह्या मेळाव्यात विविध मान्यवरांना मैत्रकूल दूत ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments