डोंबिवलीत स्वर्गीय आनंद दिघे अमर रहे च्या घोषणा स्व. धर्मवीर दिघे यांच्या होर्डिंगवर पुष्पवृष्टी

 


डोंबिबली ( शंकर जाधव ) शिवसेनेचे नेते स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित "धर्मवीर मु.पो. ठाणे" हा चित्रपट शुक्रवारी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. डोंबिवलीत मधूबन सिनेमागृहात खास शिवसैनिकांसाठी या विशेष शो चे आयोजन करण्यात होते. दरम्यान सकाळी 9 वाजता पूर्वेतील इंदिरा चौकात उभारण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या भव्य होर्डिंगवर पुष्पवृष्टी करण्यात आली त्यावेळी पुन्हा डोंबिवलीत स्वर्गीय आनंद दिघे अमर रहे घोषणांनी परिसर दणाणून गेला.


डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, शहरप्रमुख राजेश मोरे, युवा सेना अधिकारी दीपेश म्हात्रे, कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, एकनाथ पाटील, कविता गावंड, किरण मोंडकर, वैशाली राणे-दरेकर, युवा सेना सचिव राहुल म्हात्रे, संजय पावशे, सुधीर पाटील, सुखदेव पाटील, रवी पाटील, नितीन पाटील, दीपक भोसले, संतोष चव्हाण, बाळा म्हात्रे, संदीप सामंत, संदीप नाईक, प्रशांत माने, गजानन पाटील, संजीव ताम्हाणे, आदी उपस्थित होते.


     इंदिराचौक येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या भव्य होर्डिंगवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यासाठी दोन क्रेनची खास व्यवस्था करण्यात आली होती. "धर्मवीर मु.पो. ठाणे" हा चित्रपट शिवसेना शहर शाखा आणि शहर प्रमुख राजेश मोरे यांच्याकडून शिवसैनिकांसाठी विशेष शोंचे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवली तसेच ग्रामीण भागातील शिवसैनिकांनी मधूबन चित्रपटगृहात गर्दी केली होती. चित्रपट सुरू होताच आनंद दिघे अमर रहे च्या घोषणांनी चित्रपटगृह दणाणून गेले. 


      या विशेष शो नंतर डोंबिबली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे म्हणाले, चित्रपट पाहिल्यानंतर मी नागरिकांना आवाहन करतो की हा चित्रपट जरूर पहा. चित्रपट पाहिल्यानंतर रडू आलं, आम्ही दिघे साहेबांना जवळून पाहिलं नव्हतं. नागरिकांसाठी एवढी मेहनत करणे, आदिवासी भागात जाऊन प्रचार करणे, भयानक अशी मेहनत केली आहे. दिघेसाहेबांबद्दल काय बोलायचं हेच कळत नाही, कारण साहेब अतिशय मोठी व्यक्ती,  बँकेत स्वतःचे खाते नव्हते, लग्नही केलं नाही .


 चित्रपट पाहताना समजलं की त्यांच्या बहिणी त्यांना लग्नासाठी आग्रह करीत बोंब मारत होत्या पण आपलं जीवन लोकांच्या सेवेसाठी दिलं. गुरुवर्य आनंद दिघेसाहेबांबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. नेते कसे असावे हे त्यांच्याकडून बोध घेण्यासारखा आहे. कार्यकर्ता कसा असावा, काम कसे केले पाहिजे,लोकांची सेवा करण्यासाठी काम करावं असा बोध घेणारा चित्रपट आहे.

Post a Comment

0 Comments