मोटरसायकल आणि रिक्षा चोरी करणारा गजाआड

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) मोटरसायकल आणि रिक्षा चोरी करणाऱ्या चोरट्याला पकडण्यास मानपाडा पोलिसांना यश आले आहे. आकाश गुरुनाथ ढोगे वय १९,रा. भोईरवाडी, कांचनगाव, शिवमंदीर समोर, डोंबिवली पूर्व ) असे अटक आरोपीचे आरोपीचे नाव आहे.     चोरी केलेली रिक्षा आणि मोटरसायकल आरोपी आकाशनेनिळजे गावाजवळील झाडाझुडपात लपवल्या होत्या.आकाशाकडे पोलिसांनी चोरीबाबत चौकशी केली असता माहिती दिल्यानंतर मानपाडा पोलिसांनी चोरीच्या ५ मोटरसायकल आणि ५ रिक्षा हस्तगत केली.        अटक आरोपीवर यापूर्वी मानपाडा पोलीस ठाणे, मुंब्रा पोलीस ठाणे, महात्मा फुले चौक पोलीस ठाणे, भिवंडी येथील शांतीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत.पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त जे.डी.मोरे यांचे मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे पोनि शेखर बागडे,सपोनिरी अनिल भिसेपोउनि गांगुर्डेपोहवा भानुदास फाटकर,सुधीर कदम,सोमनाथ ठिकेकर, पोना संजु मासाळ, सुधाकर भोसले, शांताराम कसबेपोशि अशोक आहेर, सोपान काकड यांनी सदर कामगिरी बजावली.


Post a Comment

0 Comments