भिवंडी दि 4 (प्रतिनिधी ) शिवसेना कार्यकारिणी जनतेला उत्तम सेवा देण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहे. ८० टक्के समाजकारण आणि फक्त २० टक्केच राजकारण हे हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचे काम भिवंडी शिवसेना शहर कार्यकारिणी करताना दिसत आहे. गेल्याच सप्ताहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन आश्वारुढ पुतळ्यासाठी मा.ना.पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून ३ कोटी रूपयांचा निधी शिवसेना शहर कार्यकारिणीने मंजूर करुन घेतला होता.
आणि आज त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापासून ते मुंबई सेंट्रल पर्यंत बस सेवेचा शुभारंभ शिवसेना शहरप्रमुख सुभाष माने यांच्या शुभहस्ते होत आहे.भिवंडी शहर हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते. येथील मुख्य व्यवसाय पाॅवर लुमवर तयार होणारे कापड उद्योग होय. यासाठी बाजारपेठ म्हणजे मुंबई. आणि त्याच मुंबई ला जाण्यासाठी चाकरमनी आणि व्यवसायिक यांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. कल्याण अथवा ठाणे येथे जाऊन नंतर रेल्वेने मुंबई कडे रवाना व्हावे लागत होते.
यासाठी वेळ आणि पैसा नाहक खर्च होत होता. जनतेचे असे हाल पाहून शिवसेनेने भिवंडी बस डेपोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन छत्रपती शिवाजी महाराज चौक नझराणा सर्कल ते मुंबई सेंट्रल अशा थेट बस सेवेला मान्यता दिली. आणि आज त्याच नवीन बस मार्गाचा शुभारंभ शिवसेना शहरप्रमुख सुभाष माने साहेब यांच्या शुभहस्ते भगवा झेंडा दाखवून पार पडला. शिवसेनेच्या या कार्याने जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांना मुंबई ला पोहचण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागणार नाही. त्यामुळे ही बातमी समजल्यापासून शिवसेनेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भिवंडीचा विकास करायचा असेल, तर यापुढे शिवसेनेशिवाय पर्याय नाही अशा भावना जनता व्यक्त करीत आहे. या शुभारंभ प्रसंगी शिवसेनेचे महानगरप्रमुख श्याम पाटील, शहर सचिव महेंद्र कुंभारे,शहर समन्वयक नाना झळके, मदन भोई, दिलीप कोंडलेकर, गोकुळ कदम, सुरेश कारेकर, उमेश कोंडलेकर, राजा पुण्यार्थी, श्रीम.कोमल पाटील, अर्चना नागले, अनुराधा कल्याणम (महिला आघाडी), संजय काबूकर, मनोज पाटील, गोपीनाथ काटेकर, राकेश मोरे, श्रीनाथ पाटील, भाई वनगे, राजाभाऊ नरसाळे, गणेश शिंदे, पांडुरंग म्हात्रे, प्रदीप पाटील, अनंता जाधव, संदीप भोईर इत्यादी प्रमुख पदाधिकारी एस.टी महामंडळाचे मॅनेजर व इतर अधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments