कल्याण: ०३ मे २०२२ ; महावितरणच्या कल्याण परिमंडलात गुरुवारी सायंकाळी चार वाजता महापुरुषांची संयुक्त जंयती साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने संयुक्त जयंती उत्सव समितीकडून ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
परिमंडल कार्यालयाचे मुख्यालय असलेल्या तेजश्री इमारतीच्या प्रांगणात (जहांगिर मैदानाजवळ, कल्याण पश्चिम) जयंती उत्सव होणार आहे. महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे (भाप्रसे) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर प्रमुख संयोजक म्हणून कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
महावितरणमधील अधिकारी, अभियंते, कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हे व्याख्यान सर्वांसाठी खुले असून इच्छुकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयुक्त जयंती उत्सव समिती कडून करण्यात आले आहे.
0 Comments