डोंबिवली ( शंकर जाधव ) मनसे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी काही महिन्यांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता.आता मनसे माजी नगरसेविका पूजा पाटील यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.त्यांच्या सोबत मनसेचे तालुका प्रमुख आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि मनसैनिक गजानन पाटील, मनसेचे सचिव प्रकाश माने आणि विद्यार्थी सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
पदाधिकारी मनसेला सोडचिठ्ठी देत आहेत. डोंबिवलीचे तत्कालीन मनसे शहर प्रमुख राजेश कदम यांनी याच दृष्टीतून मनसेला रामराम केला. त्यांच्यानंतर सागर जेधे, अर्जुन पाटील यांच्यासारख्या पदाधिकाऱ्यांनी मनसे सोडली. स्वतःच्या मतदारसंघातही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना स्थान देणारे आणि दाबू पाहणारे राजू पाटील स्वतःच्या तालुक्यात सुद्धा पक्षाची बांधणी करू शकले नाहीत.
परिणामी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या काटई, उसरघर परिसरातील नगरसेविका पूजा गजानन पाटील शुक्रवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.नुकत्याच भोंग्या विरोधाच्या आंदोलनाने अनेक पदाधिकारी यांची सामाजिक अडचण झाली. त्यामुळे मनसे पदाधिकारी मनसे पक्षाला कंटाळून पक्ष सोडत असल्याचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले.
0 Comments