महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केली साकेत-राबोडी परिसरातील रस्ते, गटर्स, स्वच्छता व साफसफाई कामांची पाहणी अत्यावश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याचे दिले निर्देश

■साकेत व राबोडी परिसरातील रस्ते, गटर्स व साफसफाई कामाची पाहणी करताना महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा सोबत माजी नगरसेवक नजीब सुलेमान मुल्ला, सुहास देसाई, माजी नगरसेविका अंकिता शिंदे, वहिदा मुस्तफा खान, अतिरिक्त आयुक्त(१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे तसेच इतर अधिकारी.      


ठाणे , प्रतिनिधी :  ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी आज उथळसर प्रभाग समितीमधील साकेत-राबोडी परिसरातील रस्त्यांच्या कामांची तसेच रस्ते दुरुस्ती, स्वच्छता व साफसफाई कामांची पाहणी केली. नियमित साफसफाई, जोड रस्ते, अंतर्गत रस्ते, गटर्स, पाणी पुरवठा, गार्डन्स तसेच इतर अत्यावश्यक  कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.


         या पाहणी दौऱ्यास माजी नगरसेवक नजीब सुलेमान मुल्ला, सुहास देसाई, माजी नगरसेविका अंकिता शिंदे, वहिदा मुस्तफा खान, अतिरिक्त आयुक्त(१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त मनीष जोशी, उप आयुक्त दिनेश तायडे, उप आयुक्त अनघा कदम, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, संबंधित कार्यकारी अभियंता, उप अभियंता तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.


        साकेत येथील सबस्टेशनची इमारत सुशोभित करणे, साकेत येथील फिलींग स्टेशन येथे असलेल्या बेवारस पाण्याचे टँकर्स हटविणे, साकेत येथील वाकलेली पाण्याची लाईन दुरुस्त करणे, साकेत राबोडी येथील वॉटर फ्रंट जूनच्या पहिल्या आठवडयात सुरु करणे, ग्लोबल हॉस्पिटलच्या पाठीमागे लोढा गृहसंकुल मधून जोड रस्ता तयार करणे तसेच साकेत येथील हायवे लगतच्या गार्डनचे नुतनीकरणाचे काम  त्वरीत सुरु करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबधितांना दिले.   


         यावेळी  साकेत येथील फायरबिग्रेड स्टेशन लगतच्या इमारतीचा वापर सुरु करणे, साकेत येथील हायवे लगत पाईप लाईनच्या शेजारी असलेली झोपडपट्टी स्थलांतरीत करणे, इंटीग्रेटेड टाऊनशिप प्रकल्प (IPP) अंतर्गत प्रलंबित कामे बैठकीचे आयोजन आयोजित करणे, रुस्तमजी गृहसंकुल लगत नाला स्थलांतरीत करणेबाबत अभ्यास करणे, मोठया गृहसंकुलामधील अंतर्गत पाण्याचे व्यवस्थापन महानगरपालिके मार्फत करणे, मोठयागृहसंकुलामधील फिल्टरेशन प्रकल्पाची नियमित तपासणी करणे रुस्तमजी जलकुंभ परिसर साफसफाई करणे, रुस्तमजी गृहसंकुलामधील अंतर्गत रस्ता संबंधित विकासकाकडून सुशोभित करणे, रुस्तमजी गृहसंकुल ते ऋतुपार्क जोडरस्ता करणे, रुस्तमजी गृहसंकुल येथे नवीन बस सर्विस सुरु करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबधितांना दिले.


         तसेच " हौसिंग फॉर दिशूसे " च्या समोरील भूखंडावर पंचगंगा रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्या दुकानदारांचे पुनर्वसन करणे, गोदावरी इमारतीमधील अनधिकृत भोगवटादार यांना निष्कासित करणे, पुनर्वसनाच्या इमारतींच्या नियमित दुरुस्तीकरीता कार्यक्रम तयार करणे, शहर विकास विभागामार्फत खाजगी विकासकाकडून बांधण्यात येणाऱ्या पुनर्वसनाच्या इमारतींना ओ.सी. देण्यापूर्वी पाणी पुरवठा, विद्युत, ड्रेनेज आदी विभागांचे " ना हरकत " पत्र घेणे, आकाशगंगा गृहसंकुल यांचेकडे असलेले पार्किंग प्लाझा करीता आरक्षित भुखंड महापालिकेने ताब्यात घेणे, 


        राबोडी नाला येथे फ्लूड गेटस् बसविणे " के व्हीला " येथील मुख्य नाल्यामधील कचरा संकलित करण्याकरीता पीआयटी तयार करणे, होलीक्रॉस शाळेलगत महापालिकेचे आरक्षित भुखंडाचे आरक्षण भाजी मंडईवरुन म्युनिसिपल प्रपोज म्हणून बदल करणे, होलीक्रॉस शाळेलगत काझी बिल्डींग ते श्रीरंग कनेक्टिव्हिटी तपासणे तसेच साकेत कॉम्प्लेक्स येथील मीरा भाईंदर सबस्टेशनमुळे होणारे ध्वनी प्रदुषण कमी करणेकरीता साऊंड बॅरिअर उभारण्याचे निर्देश संबधितांना दिले. 

Post a Comment

0 Comments